नांदुरा : शहरातील जळगाव (जामोद) मार्गावरील रेल्वे गेटनजीक टिप्पर व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील महिला जागीच ठार झाल्याची घटना ८ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता घडली
तालुक्यातील येरळी येथील ज्ञानेश्वर श्रीराम वेरुळकार (वय ५५) पत्नी मंगला वेरुळकार (वय ४५) यांच्यासोबत दुचाकीने नांदुऱ्यावरून येरळीकडे जात होते. रेल्वे गेटजवळील गतिरोधकाजवळ मागून येणाऱ्या एमएच २८-बीबी- ४१७७ क्रमांकाच्या टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील मंगलाबाई यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची वार्ता कळताच नांदुरा ठाण्यातील उपनिरीक्षक किशोर घोडेस्वार, ओमसाई फाउंडेशनचे विलास निंबोळकर, पो.कॉ. अमोल राऊत, सुनील गायकवाड यांच्यासह ऋषीकेश इंगळे, विजय वानखडे यांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. महिलेचा मृतदेह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी आणला.