खामगाव (बुलडाणा) : येथील महिलेच्या गळ्यातील ७५ हजारांची सोन्याची पोथ लंपास केली. ही घटना २ ऑ क्टोबर रोजी सकाळी बालाजी प्लॉट भागात घडली. स्थानिक देवजी खिमजी मंगल कार्यालयाच्या बाजूला राहत असलेले रवी सानंदा यांच्या पत्नी जयश्री सानंदा या सकाळी घरासमोर उभ्या असताना दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या दुचाकीस्वाराने जयश्री रवी सानंदा यांच्या गळ्यातील ५ तोळ्याची सोन्याची पोथ हिसकावून पोबारा केला. यावेळी जयश्री सानंदा यांनी आरडाओरड केल्याने प्रशांत सानंदा हे घराबाहेर आले; मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. हे चोरटे अंदाजे ३0- ३५ वर्ष वयोगटातील असून, त्यांच्या अंगात मंकी जिन्स पॅन्ट व टी शर्ट असा पेहराव होता. याबाबत प्रशांत सानंदा यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
दुचाकीस्वारांकडून महिलेची पोथ लंपास
By admin | Published: October 02, 2014 11:55 PM