बुलडाणा : लैंगिक छळ, कुटुंबातील मारहाण, व इतर समस्यांनी ग्रस्त तसेच मानसिकदृष्ट्या असंतुलित महिलांच्या सामाजिक, मानसशास्त्रीय व कायदेशीर समुपदेशनासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने तालुकास्तरावर स्वयंसेवी संस्थांच्या वतीने समुपदेशन केंद्र सुरूकरण्यात आले आहे. मात्र यातील अनेक केंद्र बंद असून केवळ सपुपदेशनाच्या नावावर निधीचा अपव्यय केल्या जात आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यात प्रत्येकी एक असे समपूदेशन केंद्र आहेत. जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून या केंद्रांना १0 ट क्के अनुदान दिल्या जाते. तथापि या केंद्राची सध्याची आवस्था व निवाडे निवाडे झालेली प्रकरणे पाहता संबंधीत विभागाच्या उदासीनतेमुळे ही केंद्र केवळ कागदोपत्रीच सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यात चिखली, बुलडाणा, देऊळगावराजा, सिंदखेडराजा, मोताळा, मलकापूर, मेहकर, शेगाव, जळगाव जामोद, लोणार, संग्रामपूर, नांदुरा आणि खामगाव या तालुक्यात समुपदेशन केंद्र सुरू आहेत. जिल्हा परिषदेच्या त्रिसदस्यीय समितीमार्फत या केंद्राची निवड करण्यात येते. ग्रामविकास विभागाच्या १९ डिसेंबर २00७ च्या परिपत्रकानुसार सदर योजना तज्ञांच्या संस्थांमार्फत राबवावी. ज्या संस्थांकडे यापूर्वीच अशा प्रकारच्या समुपदेशनासाठी आवश्यक मनुष्यबळ, जागा, अनुभव व सोईसुविधा उपलब्ध आहे, असे प्रस्ताव मंजूर करावेत असा नियम आहे. मार्च अखेरीस अनुदानासाठी संस्थेकडून प्रस्ताव येतात. यावर महिला व बालकल्याण विभागाच्या सेस फंडातून दीड लाख रूपयांचे अनुदान या केंद्रांना वर्षाकाठी विभागून दिले जाते. सध्या जिल्ह्यात तेराही तालुक्यात समुपदेशन केंद्र आहेत. काही केंद्र प्रामाणीकपणे काम करतात. तर काही केंद्र कागदावर आहेत. अशा केंद्रावर कारवाई होत नाही. केवळ निधीचा अपव्यय केला जातो. या संदर्भात महिला बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचेशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचेशी संपर्क होऊ शकला नाही.
महिला समुपदेशन केंद्रे कागदावरच!
By admin | Published: April 17, 2015 1:38 AM