लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: गत तीन महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाईचे चटके सोसणाºया नागरिकांच्या भावनांचा आता उद्रेक होत असल्याचे दिसून येते. पाण्या अभावी संतप्त झालेल्या बाळापूर फैलातील महिलांनी शुक्रवारी सकाळीच पालिकेवर धडक दिली. यावेळी पालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी विलंबाने पोहोचल्याचा तीव्र संतापही नागरिकांनी व्यक्त केला.पाणी पुरवठा योजनेतील तांत्रिक बिघाड आणि आकस्मिक समस्यांमुळे गत तीन महिन्यांपासून शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत आहे. त्यामुळे शहराच्या अनेक भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. नळाची पाईपलाईन नसलेल्या भागात टँकरने पाणी पुरवठा करावा, तसेच नळ नियमित सोडावे यामागणीसाठी शुक्रवारी बाळापूर फैल, लक्कड गंज भागातील महिलांनी पालिकेत धडक दिली. यावेळी पालिकेतील अधिकारी अनुपस्थित असल्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. पालिकेच्या विहिरीवरून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणीही यावेळी काही महिलांनी लावून धरली.
टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी!शहरात नियमित नळ सोडण्यात यावे, पाणी पुरवठा योजनेत तांत्रिक बिघाड झाल्याच्या कालावधीत टँकरने संपूर्ण शहरात पाणी पुरवठा करण्यात यावा. शहरातील हातपंपांची युध्दपातळीवर दुरूस्ती करण्यात यावी, अशा विविध मागण्या यावेळी लावून धरण्यात आल्या. पाणी पुरवठा अभियंता प्राजक्ता पांडे, पर्यवेक्षक सुरजसिंह ठाकूर आणि पाणी पुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचाºयांनी नागरिकांची समजूत काढून, वेळेवर पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हा मोर्चा विसर्जीत झाला.(प्रतिनिधी)