जागतिक महिला दिन साजरा करतांना पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया बुलडाणा यांच्या संकल्पनेतून महिलांच्या सुरक्षिततेसाठी तयार झालेले महिला सुरक्षेची दशसूत्रे व सायबर सुरक्षा या दोन पुस्तिकेचे विमोचन केले. स्त्रीला देवत्व देऊन तिचे माणुसपण हिरावुन घेता येणार नाही हे आता आपल्या समाजात खोलवर रुजवणे आवश्यक आहे. स्त्रीवर अत्याचार करत सहज तिला वश करता येइल हा गैरसमज फोडून काढत अशा मनोवृत्तीच्या लोकांना आळा घालणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पाेलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी केले. ही पुस्तिका सर्व शाळा, शासकीय कार्यालये, महिला दक्षता समिती सदस्या व वर्तमानपत्रे , सोशल मीडियापर्यंत पाेहचवण्याचा मानस पोलीस अधिक्षक बुलडाणा यांनी व्यक्त केला. यावेळी अप्पर पाेलीस अधिक्षक बजरंग बनसोडे बुलडाणा तसेच सहायक पाेलीस निरीक्षक अलका निकाळजे, पाेलीस उपनिरीक्षक रिना काेरडे व इतर उपस्थित हाेते.
पाेलीस अधीक्षक कार्यालयात महिला दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 4:34 AM