शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

दारूचे दुकान हटविण्यासाठी महिलांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:02 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : येथील जुने बसस्थानक परिसरात असलेले देशी  दारूचे दुकान हटविण्यासाठी संतोषी मातानगरमधील शेकडो  महिलांनी २४ सप्टेंबर रोजी मोर्चा काढून सदर दुकान  हटविण्यासाठी दुकानाचे मालक, ठाणेदार यांच्यासमोर  गार्‍हाणे मांडून दुकान हटविण्याची मागणी केलीसदर परिसरातील देशी दारूच्या दुकानामुळे येथून ये-जा  करणार्‍या संतोषी मातानगरमधील महिला, विद्यार्थिनी,  वयोवृद्ध यांना नेहमीच त्रास ...

ठळक मुद्देसंतोषी मातानगरमधील शेकडो महिलां मोर्चा ने बसस्थानक परिसरात असलेले देशी  दारूचे दुकान हटविण्यासाठी

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : येथील जुने बसस्थानक परिसरात असलेले देशी  दारूचे दुकान हटविण्यासाठी संतोषी मातानगरमधील शेकडो  महिलांनी २४ सप्टेंबर रोजी मोर्चा काढून सदर दुकान  हटविण्यासाठी दुकानाचे मालक, ठाणेदार यांच्यासमोर  गार्‍हाणे मांडून दुकान हटविण्याची मागणी केलीसदर परिसरातील देशी दारूच्या दुकानामुळे येथून ये-जा  करणार्‍या संतोषी मातानगरमधील महिला, विद्यार्थिनी,  वयोवृद्ध यांना नेहमीच त्रास होतो.  या सर्व प्रकारामुळे संतोषी  मातानगरामधील महिला व नागरिकांना त्रास होत आहे.  त्यामुळे बसस्थानक परिसरात असलेले देशी दारूचे दुकान  इतरत्र हलविण्यासाठी शेकडो महिलांनी ६ सप्टेंबर रोजी उ पविभागीय अधिकारी डॉ.नीलेश अपार, नगराध्यक्ष  कासमभाई गवळी, तत्कालीन ठाणेदार मोतीचंद राठोड यांना  रीतसर निवेदन दिले होते. मात्र जवळपास १७ ते १८  दिवसांचा कालावधी होऊनही संबंधित अधिकार्‍यांनी अद्या प कोणतीच कारवाई केलेली नाही. जुने बसस्थानकावरील  देशी दारूचे दुकान जैसे थे सुरूच आहे. त्यामुळे महिलांनी  २४ सप्टेंबरला ठाणेदार आत्माराम प्रधान, देशी दारू  दुकानाशी संबंधित व्यक्ती यांच्याकडे शांततेच्या मार्गाने आ पली मागणी मांडून, या परिसरातून सदर दुकान तत्काळ  हटवावे; अन्यथा पुढे वेळप्रसंगी तीव्र स्वरूपाचे आंदोलन  छेडण्याचा इशारा दिला. यावेळी नगरसेवक पिंटू सुर्जन,  गणेश लष्कर, गजानन सुर्जन, सुशांत निकम, सुमीत धोटे,  शंकर साबळे, जीवन निकम सह दीपाली सुर्जन, रुपाली  सुर्जन, अरुणा साबळे, ज्योती शिंगणे, साधना तनपुरे, सरला  सदार, भारती चव्हाण, अलकाबाई रहाटे, लक्ष्मी वच्छे,  अनिता सुरुशे, सपना लाहोटी, मीरा पर्‍हाड, अर्चना डोळे,  मथुरा नागरे, किरण शेळके, अनिला राजुरकर, अंजू भंसाळी,  सुनीता तनमने, जया सारडा, पार्वती राऊत, नंदा गवई,  विमल पवार, रत्नाबाई लाकडे आदी महिला उपस्थित होत्या. 

पोलीस विभागाकडून संपूर्ण सहकार्य मिळेल -प्रधानदारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. पोलीस  विभाग दारु विक्रीला कधीही प्राधान्य देत नाही; परंतु  शासनमान्य असलेल्या दुकानांवर कारवाई करण्याचे  अधिकार हे दारूबंदी विभागाला आहेत. दारू दुकानांमुळे  जर सर्वसामान्य माणसाला, महिलांना  त्रास होत असेल, तर  त्यावर पोलीस विभागाच्यावतीने कारवाई करण्यात येईल,  दारूबंदीसाठी पोलीस विभागाकडून सहकार्य मिळेल, असे  ठाणेदार आत्माराम प्रधान यांनी सांगितले. 

दारू दुकाने मालकांकडून नियमांचे उल्लंघनमेहकर शहरात तसेच जानेफळ, डोणगाव व इतर ठिकाणी  शासनमान्य देशी दारूची दुकाने व बीअर बार मोठय़ा  प्रमाणात आहेत. परंतु, या दारुच्या दुकानात व बीअर बारवर  नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. मूळ किमतीपेक्षा जादा र क्कम आकारली जाते. दारूच्या दुकानात अथवा बीअर  बारमध्ये शौचालयाची दुरवस्था झालेली आहे. स्वच्छतेचा  अभाव आहे. दारू पिण्याचा परवाना नसताना १८  वर्षाखालील मुलांना सर्रास दारू दिली जाते. हा सर्व प्रकार  दारूबंदी अधिकारी व संबंधित बीअर बार, देशी दारू विक्रेते  यांच्या संगनमताने सुरळीत सुरू आहे. यामध्ये दरमहा  गैरमार्गाने आर्थिक उलाढालसुद्धा सुरू असते. शासनाच्या  नियमांचे पालन न करणार्‍या दारूबंदी अधिकार्‍यांवर  कारवाई करण्याची मागणी होत आहे.