खामगाव (जि. बुलडाणा) : गावात मोठय़ा प्रमाणावर गावठी दारूची विक्री होत असून, ही अवैध दारू विक्री बंद करावी, अशी मागणी तालुक्यातील नागापूर येथील महिलांना खामगाव ग्रामीण पो.स्टे.कडे १६ मार्च रोजी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, गावातील अवैध धंद्याबाबत यापूर्वी सर्व संबंधित वरिष्ठ अधिकार्यांकडे तक्रारी करूनसुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. त्यामुळे गावातील दारूचे धंदे १0 दिवसात बंद करावे अन्यथा उपविभागीय कार्यालयासमोर २३ मार्चपासून लाक्षणिक उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर शकुंतला घाईट, लताबाई ढोरे, पंचशीलाबाई वाकोडे, अरुणा इंगळे आदींसह इ तर महिलांच्या स्वाक्षर्या व अंगठे आहेत. सदर निवेदनाच्या प्रती वरिष्ठ अधिकार्यांनाही देण्यात आल्या आहेत.
दारुबंदीसाठी महिलांचा पुढाकार
By admin | Published: March 18, 2015 1:45 AM