शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

महिला बचत गटाने साकारला ‘रेशीम ज्वेलरी’चा व्यवसाय

By admin | Published: July 02, 2017 1:39 PM

गटाने रेशीमवरआधारीत ज्वेलरी निर्माण केली आहे. तसेच विलींग पेपरवरील कलाकुसरहीत्यांची वाखाणण्यासारखी आहे.

बुलडाणा : आपल्या जीवनात सकारात्मकेची जोड देत अनेकमहिला बचत गटांच्या माध्यमातून  उन्नती करीत आहेत. अशा महिलांचे कार्यम्हणजे. शेळीपालन, दुग्धव्यवसाय,  शेतमाल ग्रेडींग, रोपांची नर्सरीआदी व्यवसाय महिला बचत गटांमार्फत सुरू असल्याचे आपण ऐकले आहे. मात्र एकाअनोख्या व्यवसायातून उभारी घेत असलेल्या खामगांव तालुक्यातील सुटाळाखुर्द येथील कलांगण महिला बचत गटाचे काम वेगळेच आहे. या गटाने रेशीमवरआधारीत ज्वेलरी निर्माण केली आहे. तसेच विलींग पेपरवरील कलाकुसरहीत्यांची वाखाणण्यासारखी आहे.खामगांवसारखे शहर जवळ असल्यामुळे या महिला बचत गटाला त्यांनी निर्माणकेलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळविणे सोपे गेले. रेशीम धाग्यांच्या गाठीआणून बचत गटातील महिला त्यापासून कानातील दागिणे, नाकातील नथणी,बांगड्या, हार, साडी पिन, तोरड्या आदी ज्वेलरी बनवितात. रेशीम व अन्यज्वेलरीचे साहित्य जळगांव, मुंबई व अकोला येथून आणतात. त्यापासूनप्रत्येक स्त्रीला आकर्षित करून घेण्याची क्षमता असलेले दागिण्‌यांचीनिर्मिती करण्यात येते. अशा या अनोख्या ज्वेलरीमुळे खामगांव व परिसरातीलमहिला बचत गटाच्या दागिण्यांची आतुरतेने वाट बघत असतात. बचत गटाच्याअध्यक्ष सविता किशोर देशमुख यांनी बचत गटाच्या माध्यमातून सुरूअसलेला आधीचा व्यवसाय बंद करीत एका नवीन व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली.   सुटाळा खुर्द येथील महिलांना एकत्रित करीत आपल्या कला-गुणांच्याउपयोगातून नवीन उत्पादने करण्याचा निर्णय घेतला. त्यांना सचिव वैशालीदेशमुख यांची समर्थ साथ लाभली. तसेच भाग्यश्री भूषण इगवे, रूपालीशालीग्राम टेकाडे, संगीता राजपूत, मेघा दूधे या महिला सदस्यांनी आपल्याकला-गुणांचे सादरीकरण करीत अनोखी रेशीम ज्वेलरी आकारास आणली आहे.एवढ्यावरच हा बचत गट थांबला नाही, तर विलींग पेपरद्वारे, प्लायवूडद्वारेलग्न समारंभासाठी लागणाऱ्या विविध वस्तू बनविण्यास गट अग्रेसर राहीलाआहे.  लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. अशाअविस्मरणीय प्रसंगाला लागणारे साजही महत्वाचे ठरतात. त्यामध्ये वर, वधूयांना लागणारे जेवणाची ताटे, बसण्यासाठी चौरंग यांचा प्रामुख्याने समावेशअसतो. वऱ्हाडामध्ये लग्नात मुलींसोबत रूखवत देण्याची प्रथा आहे. यारूखवतामध्ये घर  सुशोभीत करणाऱ्या वस्तू असतात. सदर वस्तू कलांगण महिलाबचत गट उत्कृष्टरित्या बनवितो. त्यामध्ये वर-वधूचे ताट, चौरंग, दरवाजाचेतोरणे, लोकरीच्या पर्स, आकर्षित करणारी बैलजोडी, घरात दर्शनी भागातठेवण्याच्या वस्तू, लाईटच्या व्यवस्थेसह असलेले दिवे, वर-वधूंचे श्रृंगारसाहित्या आदींचा समावेश आहे. सध्या बनविलेल्या वस्तूंपेक्षाही जास्तमागणी या बचत गटाकडे आहे. केवळ खामगांव व परिसरापूतेच कलांगण महिला बचतगटाच्या वस्तू मर्यादीत नाही, तर जिल्ह्यात वस्तू विक्रीस जात आहे.स्टेशनरी दुकांनामधूनही ही रेशीम ज्वेलरी आता चांगलाच भाव खावून जात आहे.महिलांच्या अप्रतिम सृजनशीलतेला नक्कीच चांगला दर मिळत आहे. दिवाळी,रक्षाबंधन, दसरा, गणेशोत्सव, गौरी पूजन, मकरसंक्रांत आदी सणांच्या दिवसातमोठ्या प्रमाणावर नवनवीन वस्तू हा बचत गट तयार करीत असतो. या बचत गटालाआयडीबीआय बँकेकडून कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. बँकेचे पासबूक तयारझाले असून गटाचे काम बघून बँकेने त्यांना अर्थपुरवठा करण्याचा निर्णयघेतला आहे.     कलांगण महिला बचत गट कच्चा माल व लागणारी मजूरी वजा जाता चांगला नफामिळवित आहे. विलींग पेपरवरील कलाकुसर, तर या बचत गटाची अगदी दर्जेदारआहे. महिलांचे बाजूबंद, बिंदीया, साडी पिन, हार, कानातील दागिणे असेकितीतरी वस्तू हा बचत गट तयार करून आपले नावाचा वेगळा ठसा उमटवित आहे.    केवळ पारंपारित व्यवसायात गुंतून संथ गतीने आर्थिक विकास साधणारेअनेक बचत गट आहेत. मात्र अशा कल्पक व्यवसायातून कलांगण महिला बचत गटाचेकार्य वेगळेपण जपणारे आहे. त्यांच्या या व्यवसायातून अनेक महिलांनाप्रेरणा मिळत आहे. खामगांव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या या बचतगटाला विविध प्रदर्शनांमधूनही वस्तू विक्रीची संधी मिळत आहे.