बुलडाणा : चिखली तालुक्यातील वळती येथील महाजल योजनेचे काम गेल्या चार वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. योजनेचे काम तत्काळ मार्गी लावावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व ग्रामस्थांनी २८ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु केले आहे. वळती येथे नोव्हेंबर २०१४ मध्ये महाजल योजनेचे काम मंजूर झाले. मात्र चार वर्ष उलटले तरी काम पुर्णत्वास गेले नाही. कामाची गती अत्यंत संथ असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. उन्हाळा सुरु होण्याआधीच काम पुर्ण करावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाºयांकडे पाठपुरावा करण्यात आला. तर काही दिवसांपूर्वी संघटनेने चिखली ग्रामिण पाणीपुरवठा कार्यालयात आंदोलन केले होते. याप्रकरणी १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आश्वासन उपअभियंता यांनी दिले होते. परंतू तीन महिने उलटले तरी चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले. या आंदोलनात शेख मुख्तार, भगवानराव मोरे, सुनील कºहाडे, अशोक सुरडकर, अमोल तेलगुडे, दीपक धनवे, संतोष चिंचोले, गोपाल चिंचोले, पश्चिम विदर्भ संघटक बबनराव चेके, सुनील चिंचोले, शेख अकिल शेख शब्बीर, उध्वद धनवे, कचरु हिवाळे, शेख जाफर शेख रसूल, शेख एजाज शेख अकबर, गणेश शिंगणे, सिराज पटेल, कबीर पटेल, गजानन हिवाळे, वसीम खान, मोहसीन खान, शे. नईम शे. हशम, परमेश्वर जगताप, विशाल चिंचोले, विनोद धनवे, लियाकत असद यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.
महाजल योजनेचे काम रखडले ; वळती ग्रामस्थांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 5:11 PM
योजनेचे काम तत्काळ मार्गी लावावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व ग्रामस्थांनी २८ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु केले आहे.
ठळक मुद्दे वळती येथे नोव्हेंबर २०१४ मध्ये महाजल योजनेचे काम मंजूर झाले; मात्र चार वर्ष उलटले तरी काम पुर्णत्वास गेले नाही. काम पुर्ण करावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाºयांकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले.