गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या
साखरखेर्डा : परिसरातील मलकापूर पांग्रा व इतर गावांमध्ये गुरुवारी सायंकाळी वादळासह गारपीट झाली. त्यामुळे रब्बी पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागाचे सर्वेक्षण करून भरपाई देण्याची मागणी हाेत आहे.
पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदाेस सुरूच
बुलडाणा : ग्रामीण भागात गत काही दिवसांपासून पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदाेस सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. देऊळगाव घाट व करवंड येथे पिसाळलेल्या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतला आहे. या कुत्र्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी हाेत आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
जऊळका परिसरात अवैध वृक्षताेड जोरात
जऊळका : परिसरात गत काही दिवसांपासून अवैध वृक्षताेड वाढली आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत असल्याचे चित्र आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन वृक्षताेड थांबविण्याची मागणी हाेत आहे.
बामखेड, असोला रस्त्याची दुरवस्था
सिंदखेडराजा : बामखेड, आसोला रस्त्याची दुरवस्था झाली आहे. येथील बसस्टँडलगत असलेला बामखेड, आसोला रस्ता तत्काळ दुरुस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. याविषयी निवेदन देण्यात आले आहे.
बांधकाम साहित्याचे दर वाढले
धामणगाव बढे : सध्या नवीन घरांचे बांधकाम करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे दर गगनाला भिडल्याने अनेकांच्या घराचे स्वप्न आजच्या घडीला महागाईच्या विळख्यात सापडले आहे. विटांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे.
रिक्त पदांमुळे कामाचा ताण वाढला
बुलडाणा : पोलीस उपनिरीक्षकांची संख्या ११९ हवी असताना प्रत्यक्षात ३३ पोलीस उपनिरीक्षक जिल्ह्यात कमी आहेत. पोलीस निरीक्षकांचीही संख्या जिल्ह्यात कमी आहे. त्यामुळे नियमित कामांव्यतिरिक्त अन्य कामे सांभाळताना कर्मचाऱ्यांवर ताण येतो.
अवैध टॉवर उभारणीकडे दुर्लक्ष
बीबी: मेहकर ते सिंदखेड राजा मार्गाच्या बाजूला अनेक ठिकाणी अवैध टॉवर उभारण्यात आल्याचे दिसून येते. काहींच्या शेतात टॉवर उभारलेले असून, शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. यात खासगी कंपनीच्या टॉवरचा समावेश आहे.