बुलडाणा: काँंग्रेस कार्यालयासमोर तणाव वाढला होता. तणावाचे रूपांतर हाणामारीत होण्याची शक्यता होती. त्यावेळी या ठिकाणी आ. हर्षवर्धन सपकाळ आले व त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची समजूत काढली. तसेच कार्यकर्त्यांना येथून गर्दे वाचनालयात कार्यक्रमाकरिता जाण्याचे आवाहन केले. मात्र, त्यानंतरही त्यांच्या विरोधात तक्रार देऊन गुन्हे दाखल केल्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या समर्थनार्थ आंदोलनाचा इशारा दिला आहे. भाजप व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वाद होत असताना काही कार्यकर्त्यांनी आ. सपकाळ यांना खांद्यावर घेतले व सर्व जण गर्दे वाचनालयाकडे गेले. त्यामुळे तणाव निवळला. आ. सपकाळ यांच्यासोबत कार्यकर्ते गर्दे वाचनालयात गेल्याने वातावरण शांत झाले. मात्र, त्यांच्या विरोधातच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली. यानंतर काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते व नेते गर्दे वाचनालयात कार्यक्रमात गेले. या प्रकरणामुळे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करीत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळू नये, याकरिता केलेला खटाटोप - आ. बोंद्रे काँग्रेसच्यावतीने शेतकऱ्यांच्या मागण्यांकरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, शेतकऱ्यांना न्याय मिळू नये, ही भूमिका असलेल्यांनी कार्यक्रमापासून शेतकऱ्यांचे लक्ष विचलित करण्याकरिता काँग्रेस कार्यकर्त्यांजवळ जाऊन हा खटाटोप केला. यामागे सवंग प्रसिद्धी मिळविणे हाच यामागील उद्देश आहे. सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना काळे झेंडे दाखविणे हास्यास्पद आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दहा- पंधरा भाडोत्री कार्यकर्ते आणून कार्यक्रमात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्याचा मी निषेध करतो. मात्र, अशा कार्यकर्त्यांमुळे काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये कोणताही फरक पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
सपकाळ यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते सरसावले!
By admin | Published: July 13, 2017 12:34 AM