मेहकर : स्थानिक श्रीमती सिंधुताई जाधव कला व विज्ञान महाविद्यालयात लघुउद्योग व स्वयंरोजगार कार्यशाळा आयोजित करण्यात आली. ही कार्यशाळा विवेकानंद शिक्षण संस्था मेहकर व सिंधुताई जाधव महाविद्यालय यांच्या वतीने घेण्यात आली. या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून पुरुषोत्तम भराड लाभले होते.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.बी.आर. लाहोरकर होते. प्रा.डॉ.सुरळकर, प्रा.डॉ.मोहिते, प्रा.डॉ.एस.एम. खडसे, प्रा.कैलास उबाळे, प्रा.शिवशंकर मोरे, प्रा.डॉ.दीपक जैताळकर, प्रा.संभाजी गवळी, प्रा.ओम आढाव, प्रा.मैंद, नेहा फोलोने, प्रियांका देशमुख, राजेश कोडापे, रामेश्वर शेवाळे, रिद्धी शर्मा, ऋषिकेश बघे यांची प्रमुख उपस्थिती होती. भराड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ग्रामीण तरुणांनी आव्हानाला सामोरे जावे. नोकर ते मालक असा प्रवास आपल्या स्वकष्टाने व आत्मविश्वासाने करावा. प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगले काम करण्यासाठी संधी आहे. त्या संधीचं सोने करावे आणि स्वावलंबी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. आपल्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य लाहोरकर यांनी लघुउद्योग व स्वयंरोजगाराच्या आधारे तरुणांनी आपल्या संधी स्वतः निर्माण कराव्यात आणि त्या संधीचा फायदा घेऊन स्वावलंबी व्हावे, असे आवाहन केले. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा.डॉ.एम.आर. शिंदे तर संचालन धनश्री तांगडे हिने केले. आभार कोमल सरकटे हिने मानले.