शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
4
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
5
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
6
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
7
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
8
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
9
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
10
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
11
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
12
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
13
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
14
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
15
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
16
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
17
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
18
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
19
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

श्रद्धेय बाबूजींचे विचार आजही प्रेरणादायी - बोंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2017 12:49 AM

चिखली : आदर्शांची रुजवणूक करणारे ‘लोकमत’चे संस्थापक संपादक श्रद्धेय बाबूजींचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आमदार राहुल बोंद्रे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : श्रद्धेय बाबूजींनी घालून दिलेल्या आदर्शावरून वाटचाल करीत ‘लोकमत’ने कायम शोषित, पीडित व वंचितांना न्याय देण्याचे कार्य केले असल्याने, ‘लोकमत’ने सर्वसामान्यांमध्ये एक अढळ स्थान प्रस्थापित केले आहे. या आदर्शांची रुजवणूक करणारे ‘लोकमत’चे संस्थापक संपादक श्रद्धेय बाबूजींचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आमदार राहुल बोंद्रे यांनी केले.स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक-संपादक श्रद्धेय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजींच्या जयंतीनिमित्त लोकमत चिखली तालुका कार्यालयात अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला सामाजिक, राजकीय, प्रशासन, सहकार, शिक्षण, साहित्य, शेती व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. यामध्ये प्रामुख्याने आमदार राहुल बोंद्रे, तहसीलदार मनीष गायकवाड, न.प. मुख्याधिकारी वसंतराव इंगोले, एबीडीओ अमोल ताकभाते, माजी नगराध्यक्ष सलीम मेमन, सुहास शेटे, भाजपा युवा नेते कुणाल बोंद्रे, नगरसेवक पंडितराव देशमुख, गोपाल देव्हडे, भाजपा शहराध्यक्ष सुरेंद्रप्रसाद पांडे, शैलेश बाहेती, भानुदास कुटे, अजीम शेख, संजीव जाधव यांची उपस्थिती होती. दरम्यान, शेतकऱ्यांवर सातत्याने नैसर्गिक आपत्तीमुळे, हवामान बदलामुळे संकटे येत आहेत. शेतमालाचे भाव पडलेले आहेत सोबतच कर्जमाफी व शासनाकडून जाहीर मदत न मिळाल्याने तसेच तुरीचे चुकारे व नोंदणी झालेल्या तुरीचे मोजमाप बाकी असल्याने शेतकरी व शेतीसमोरील या संकटांच्या काळात शेतकऱ्यांना धीर देऊन नवी उमेद दाखविण्यासह चौकटी बाहेर जाऊन नेहमी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक आदी प्रत्येक आघाडीवर तत्परता दर्शविणारे वृत्तपत्र म्हणून ‘लोकमत’ने आपली ओळख प्रस्थापित केली असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. प्रास्ताविक व आभार लोकमत तालुका प्रतिनिधी सुधीर चेके पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी लोकमत समाचारचे युसुफ शेख व बळीराम गुंजाळ यांनी परिश्रम घेतले.