मलकापूर पांग्रा : महिनाभरापासून मलकापूर पांग्रा गाव परिसरात जखमी लांडोर महिना भरापासून भटकंती करीत आहेत. दरम्यान, तस्करांच्या तावडीतून सुटतांना ती जखमी झाल्याची चर्चा गाव परिसरात आहेत. ही जखमी लांडोर गावातील या घरावरून त्या घरावर फरताना दृष्टीपथास येत आहे. पाण्याच्या शोधात ती गावात आली नसल्याचे सकृत दर्शनी दिसते. तिचा एक पाय जखमी असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, परिसरात काही ठिकाणी वन्यजिवांची शिकार करणारे सक्रीय असून त्यांच्या तावडीतून सुटताना ही लांडोर जखमी झाली असावी, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. सिंदखेड राजा तालुक्यात आगेपळ, झोटींगा परिसरात वन्य प्राण्यांची शिकार होत असल्याची नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे. मात्र वनविभागाकडून त्यासंदर्भात दुजोरा मिळालेला नाही. मात्र या लांडोरीला सध्या उपचाराची गरज आहे. वनविभागाच्या कर्मचार्यांनी या लांडोरीला पकडून तिच्यावर उपचार करीत तिला सुरक्षीत स्थळी सोडण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
जखमी लांडोरी बाबात आम्हाला कोणी कळवलेले नाही. आपण लवकरच माहिती घेऊन वनविभगाच्या पथकला मलकापूर पांग्रा येथे पाठवतो. जखमी असलेल्या या पक्षावर त्वरित उपचार करून त्याला पुन्हा सरक्षीतपणे वनविभागात सोडण्यात येईल.
- बी. टी. भगत, जिल्हा उप वन संरक्षण अधिकारी, बुलडाणा
वन विभागाचे पथक दाखल
जखमी लांडोरीला ताब्यात घेण्यासाठी लगोलग जिल्हा उप संरक्षकांनी एक पथक मलकापूर पांग्रा येथे पाठवीले असून लांडोरीला ते पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत.