बुलडाणा/मलकापूर : कोरोना संसर्गाचा उद्रेक सुरू झालेल्या मलकापूर शहरात प्रशासनाने प्रो अॅक्टीव भूमिका घेतली असून ११ कंटेन्मेंट झोनमध्ये संदिग्ध रुग्ण आढल्यास त्याच्या शरीरातील आॅक्सीन लेव्हल तपासण्यासोबतच त्याचा एक्सरेही काढण्यात येणार आहे.प्रशासकीय पातळीवर तशा हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती सुत्रांनी दिली. मलकापूर तालुक्यात आतापर्यंत ४८ कोरोना बाधीत आढळून आले असून यातील १८ जण कोरोना मुक्त झाले आहेत. शहरात ६० हजार नागरिकांचा रॅपीड सर्व्हे ही करण्यात आला आहे. १५ जून रोजी एकाचवेळी तालुक्यात ११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर आता येथील कथितस्तरावरील समुह संक्रमण रोखण्यासाठी प्रशासन सक्रीय झाले आहे. त्यानुषंगाने शहरातील ११ ही कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांच्या शरीरातील आॅक्सीजन लेव्हल आणि गरज पडल्यास त्यांचा एक्सरे जागेवरच काढण्याची भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.यासंदर्भात दोन दिवसा अगोदर जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी मलकापूर शहरातील गंभीर बनू पाहणारी स्थिती पाहता अधिकाऱ्यांची बैठक घेवून आढावा घेतला. सोबतच शहरात होणाºया कॉन्टॅक्ट ट्रेसिंग संदर्भातही अधिकाऱ्यांकडून बारकाईने माहिती घेतली. दरम्यान, मलकापूर शहरातील तीन बाधीत रुग्ण बरे होण्याच्या मार्गावर असून प्रसंगी त्यांची १७ जून रोजी सुटी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मलकापूर शहरात दहा जून नंतर बाधीत झालेले रुग्णच तेवढे उपचारासाठी रुग्णालयात असतील.
संसर्गाचा स्त्रोत टप्प्यातमलकापूर शहरात मुळ पाच व्यक्तींपासून कोरोनाचा संसर्ग झाल्याचे अभ्यासाअंती समोर येत आहे. त्यांच्याकडून अन्य दहा जणांना संक्रमण झाल्याचे स्पष्ट होत आहे. येथील संवेदनशील स्थिती पाहता प्रशासनाने तब्बल २५० व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले. दरम्यान शहरातील काही सिव्हीअर पेशंटमुळे स्प्रेड वाढला होता. परंतू आता स्थिती रिकव्हर होत आहे जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांनी येथे भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला.