शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

गावठी दारू अड्यांवर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हे

By admin | Published: October 23, 2016 1:56 AM

बुलडाणा शहर पोलिसांची कारवाई; १६ हातभट्या केल्या उद्ध्वस्त.

बुलडाणा : शहरातील अवैधरीत्या चालणार्‍या देशी व गावठी दारू अड्डय़ावर शहर पोलिसांनी २२ ऑक्टोबर रोजी धाडी टाकून १६ हातभट्टय़ा उद्ध्वस्त केल्या. यामध्ये ६१ हजार रुपयांचा माल जप्त करून, १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. दारूच्या अड्डय़ावर धाड टाकण्याची कारवाई शहरातील भिलवाडा व मिलिंदनगर परिसरात करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे देशीसह गावठी दारूची विक्री करणार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.मागील काही दिवसांपासून नगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. निवडणुकीदरम्यान शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर यांच्या आदेशान्वये शहरात अवैध व्यवसायाविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, आज ठाणेदार अंबादास हिवाळे यांच्यासह त्यांच्या पथकाच्या कर्मचार्‍यांनी शहरातील भिलवाडा व मिलिंदनगर परिसरात धाडी टाकून ६१ हजार रुपयांचा माल जप्त करून संदीप काकडे, चंद्रकांत नरवाडे, नीलेश बोरकर, मंगला गायकवाड, विमल किशोर, बाळकृष्ण निकम, अशोक हिवाळे, गोपाल ठाकूर, शशीकला सोळंके, राधा गायकवाड, ताराबाई बरडे, सुशीला गायकवाड व रंजना मोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच १६ हातभट्टय़ा उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक ठाकूर, पाटील, पोलीस उपनिरीक्षक हिवराळे, पोहेकॉ दाभाडे, लक्ष्मण जाधव, राजू चौधरी, घुगे, निकम, लेकुरवाळे यांनी केली आहे. बुलडाणा शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी अवैध दारू विक्री होत असून, याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.