याचा विपरित परिणाम महाबीजच्या चालू हंगामाच्या उद्दिष्टावर झाला असून, यंदा ९ हजार ७३३ हेक्टरवरच बिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये यावर्षी ३ हजार ३२ शेतकऱ्यांना सामावून घेण्यात आले आहे.
यंदा प्रामुख्याने कापूस ५ हेक्टर (सुधारित), ज्यूट १६० हेक्टर, मूग १८४ हेक्टर, सोयाबीन ८ हजार ४४४ हेक्टर, उडीद ७२३ हेक्टर, तुरीचे २१६ हेक्टरवर बिजोत्पादन करण्यात येणार असल्याची माहिती महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक आर. एस. मोराळे यांनी दिली.
--६० कोटी रुपयांचा शेतकऱ्यांना लाभ--
बिजोत्पादन कार्यक्रमात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना चिखली, खामगाव आणि मेहकर येथील बाजार समित्यांमधील महत्तम भावाच्या २० ते २५ टक्के अधिक मोबदला पास केलेल्या बियाण्यावर महाबीज देते. त्यामुळे शेतकरी प्रामुख्याने या बिजोत्पादन कार्यक्रमाकडे वळत आहेत. सरासरी दर हे हमीभावापेक्षा कमी आले तर जो फरक आहे तो शासनाकडून बिजोत्पादकाला देण्यात येतो. त्यामुळेच यावर्षीही महाबीजच्या जिल्हा कार्यालयात बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. सध्या बियाणे वाटपास महाबीजने प्रारंभ केला आहे. बुलडाणा, चिखली, मेहकर, कामगाव मलकापूर, देऊळगाव राजा येथील महाबीजच्या कार्यालयातून शेतकऱ्यांना बिजोत्पादन कार्यक्रमासाठी कच्चे बियाणे दिले जात आहे.
--भाजीपाला उत्पादनालाही प्रोत्साहन--
जिल्ह्यात भाजीपाला उत्पादनालाही बीज प्रक्रियेच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात येत असून, २५.७० हेक्टरवर यंदा हा उपक्रम राबविला जाणार आहे. यात संकरित शिरी तोडका, दुधी भोपळा, चोपडा तोडका, संकरित भेंडी, बांगे, चवळी, गवार याचा समावेश असल्याचे सुत्रांनी सांगितले.