लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद : डोक्यात फावडे मारून जखमी केलेल्या रामलाल ठावरसिंग भोंगळ्या नामक तरूणाचा दोन दिवसानंतर उपचाराअभावी मृत्यू झाला.ही घटना आदिवासी ग्राम राजूरा खूर्द येथे घडली. याप्रकरणी जळगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी बिसन गंगाराम बाल्या याला अटक केली आहे. राजूरा खूर्द येथील महिला दुगाबाई नावसिंग जामरू ही मोठा जावई रामलाल भोंगळ्या याच्यासोबत शेतात राहते. तीच्यासोबत तीची फारकती झालेली लहान मुलगी सलिता नावसिंग जामरू ही सुद्धा राहते. तीचे लग्न बिसन गंगाराम बाल्या याच्याशी झाले होते. रविवारी रात्री बिसन हा दोन सहकाऱ्यांसोबत दुगार्बाई यांच्याकडे आला. रात्री मुक्काम केला. सोमवारी पहाटे बिसनने मोठा साळभाऊ रामलाल भोंगळ्या याच्या डोक्यात फावड्याने वार केला. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. आरोपी तेथून पळून गेला. याप्रकरणी दुगार्बाई हीने पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी रामलालला उपचारासाठी भरती केले. डाँक्टरांनी त्याला अकोला येथे पाठवले. तेथून नागपूरला हलविण्याचा सल्ला डाॅक्टरांनी िदला हाेता. मात्र, रूग्णवाहिका उपलब्ध नसल्याने रामलालला घरी परत आणण्यात आले. मंगळवारी पुन्हा नागपूरला जाण्याची तयारी करत असताना त्याचा वाटेचत मृत्यू झाला. जळगाव पोलिसांनी भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. तपास उपनिरिक्षक सतीश वळवी करीत आहेत.