शेगाव : तालुक्यातील जवळा पळसखेड येथे शेतनाल्यावर आंघोळीसाठी गेलेला १८ वर्षीय युवक वाहून गेल्याची घटना मंगळवारी सकाळी ८ ते ९ वाजेदरम्यान घडली. शेगाव ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून मुलाचा शोध घेणे सुरू आहे.
सोमवारी सायंकाळपासून सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाने चांगलाच जोर धरला. धोधो पाऊस पडल्याने शेगाव तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आला आहे. त्यामध्ये
बाळापूर रोडवर असलेल्या जवळा पळसखेड या गावात राहणारा आदित्य संतोष गवई हा युवक त्याच्या मित्रांबरोबर गावातून वाहत असलेल्या शेतनाल्यावर पूर आल्याने आंघोळीसाठी गेला होता. आंघोळी दरम्यान हा युवक त्याच्या मित्रांना तो पाण्यामध्ये बुडाल्याचे लक्षात आले. त्यांनी बराच वेळ त्याठिकाणी शोध घेतला. मात्र, तो कदाचित वाहून गेला असेल असा समज झाला आहे. परिसरातील नागरिक पोहणारे युवक नाल्याच्या पाण्यामध्ये युवकाचा शोध घेत आहेत. या घटनेची माहिती शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला कळविण्यात आली. घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबल अरुण मेटांगे, पोलीस नायक कॉन्स्टेबल प्रवीण इतवारे हे दाखल झाले आहेत.