लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : मोटारसायकल चोरीच्या संशयावरून एका ३० वर्षीय युवकास बेदम मारहाण केल्याची घटना शनिवार, दि. १३ फेब्रुवारी रोजी अंत्रज येथे घडली.शहापूर येथील श्रीकृष्ण शिवदास वाडेकर (३०) हा युवक शनिवारी जावई संजय श्रीराम कळसकार यांच्याकडे पैसे आणण्यासाठी गेला होता. दरम्यान, गावातील एका इसमाची मोटारसायकल चोरीस गेली. मोटारसायकल चोरीच्या संशयावरून महादेव वाघ, नागेश महादेव वाघ, उमेश यशवंत वानखडे, महेंद्र राजाराम वानखडे यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून श्रीकृष्ण शिवदास वाडेकर (३०) रा. शहापूर यास काठी, चामडी पट्टा व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी संजय श्रीराम कळसकार यांनी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून उपरोक्त चार व इतर पाच जणांविरुद्ध भादंवि कलम १४३, १४७, १४८, ३२४, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास एएसआय दीपक इलामे करीत आहेत. या प्रकरणी पुढील तपास खामगाव पाेलीस करीत आहेत. जखमी युवकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मोटारसायकल चोरीच्या संशयावरून युवकास बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 12:21 PM