लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : शेतकऱ्यांची कर्जमाफी ही जाचक अटीमुळे रखडली असून, सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे. तसेच सर्वसामान्यांच्या विविध मागण्या तत्काळ पूर्ण कराव्यात, अन्यथा युवक काँग्रेसच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांना ६ जुलै रोजी निवेदनाद्वारे देण्यात आला.शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कर्ज आहे. सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली आहे. त्यामध्ये जाचक अटी लावण्यात आल्या. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेची प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत व इतर मागण्या पूर्ण कराव्या; अन्यथा मेहकर विधानसभा युवक काँग्रेसच्यावतीने आंदोलनाचा इशारा युवक काँग्रेसचे दिलीप बोरे, संतोषराव पांडव, युनूस पटेल, यासीन कुरेशी, आकाश जावळे, प्रकाश सुखदाने, कैलास चनखोरे, राजेंद्र बोरे, समाधान बोरे, जुबेर खान, उमर शाह, जुबेर कुरेशी आदींनी दिला.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2017 1:09 AM