लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : भाजपा सरकार सत्तेवर आल्यापासून सर्वच बाजूंनी अपयशी ठरत आहे. देशात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सरकार नोकर्या व रोजगार देण्यास अपयशी ठरले आहे. भाजपाचा निषेध करण्यासाठी मेहकर, देऊळगावराजा, लोणार, डोणगाव येथे युवक काँग्रेसच्यावतीने १४ फेब्रुवारी पकोडा तळून आंदोलन करण्यात आले.
डोणगाव येथे आंदोलनयुवक काँग्रेसच्यावतीने येथील बसस्थानकावर पकोडा तळून आंदोलन करण्यात आले. सन २0१४ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी आम्ही दरवर्षी एक कोटी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊ, अशा भूलथापा देऊन सत्तेवर आले; परंतु अद्यापपर्यंत कुठेही रोजगार उपलब्ध करून देऊ शकले नाही व सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या जखमेवर मीठ घालून पकोडा विकण्याचा रोजगार आम्ही उपलब्ध करून दिला आहे. अशा बतावण्या सरकार करीत आहे. याचा निषेध म्हणून डोणगाव काँग्रेसच्यावतीने पंतप्रधान पकोडा रोजगार योजनेत पकोडा विकून २३0 रुपये मुख्यमंत्री आपद्ग्रस्त योजनेत जमा केले. दुपारी २ वाजता स्थानिक बसस्थानकावर काँग्रेस नेते शैलेश सावजी यांच्या उपस्थितीत युवक काँग्रेसचे सुशिक्षित बेरोजगार जैनुल ओबेद्दीन, आकाश जावळे, जावेद ठेकेदार, श्याम इंगळे, वसीम बागवान, अबरार मिल्ली, सोहेल शेख, आनंदसिंग दिनोरे, संतोष मोहळे, रमेश परमाळे यांनी पकोडे तळून विकले व निषेध करीत जमा झालेले २३0 रुपये मुख्यमंत्री आपद्ग्रस्त निधीत जमा केले. या आगळय़ा-वेगळय़ा आंदोलनाने डोणगावात बुधवारी बाजाराच्या दिवशी पकोडे खाणार्यांची गर्दी झाली होती; पण मोदी सरकारच्या कालावधीत बळीराजावर येणार्या वेगवेगळय़ा संकटांनी अनेकांनी पैशांअभावी पकोडे खाणे टाळले.
देऊळगावराजा : भजी वाटप करून शासनाचा निषेधयेथील बसस्थानक चौकात जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा जि.प. सदस्य मनोज कायंदे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा.दिलीप सानप, काँग्रेस नेते रमेश कायंदे यांच्या नेतृत्वात पकोडे व भजी वाटप करून सरकारच्या विरोधात घोषणा देत निषेध नोंदवला. प्रारंभी यावेळी भाजप सरकारच्या विरोधात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. बसस्थानक चौकातून निषेध नोंदवत युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तहसील कार्यालयाच्या आवारात दाखल झाले. तहसीलदार दीपक बाजड यांना निवेदन देण्यात आले. हनिफ शहा, इस्माईल बागवान, महम्मद रफीक, अतिष कासारे, सैयद भाई, रामदास डोईफोडे, शे.नसीम, योगेश मिसाळ, गजानन काकड, नितीन कायंदे, पी.डी. म्हस्के, राजू बोराटे, मंगेश तिडके, गजानन गुरव, यश कासारे, आकाश कासारे, शालीक मुंडे, अख्तर खान, अशपाक शहा, शेख अकबर, मुबारक पठाण, गजानन तिडके, सतीश झिने, नासेर बागवान, याकूब खान यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते हजर होते.मेहकर येथे तीन ठिकाणी आंदोलन युवक काँग्रेसच्यावतीने नागसेन चौक जानेफळ फाटा व जिजाऊ चौकामध्ये भाजपा सरकारच्या विरोधात १४ फेब्रुवारी रोजी पकोडा आंदोलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भीमशक्तीचे नेते भाई कैलास सुखधाने होते, तर प्रमुख उपस्थिती देवानंद पवार, शहराध्यक्ष कलीम खान, न. प.चे गटनेते मो. अलीम ताहेर, नामीम कुरेशी, वसंतराव देशमुख, श्याम देशमुख, यासीन कुरेशी माजी नगरसेवक शैलेश बावस्कर, नगरसेवक पंकज हजारी, अलियार खान, संजय ढाकरके, नीलेश सोमण, तौफिक खान, संजय सुळकर, धीरज अंभोरे, आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मोदी सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले असून, देशात दिवसेंदिवस सुशिक्षित बेरोजगारी वाढत आहे. तरुण रोजगाराअभावी त्रस्त झाले असून, भाजपाचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेसच्यावतीने पकोडा आंदोलन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युनूस पटेल यांनी केले, तर आभार युवक काँग्रेसचे रवी मिस्किन यांनी मानले. कार्यक्रमास वसीम कुरेशी, दिलीप बोरे, आशिष देशमुख फिरोज काजी, नीलेश बावस्कर, नावेद खान, प्रकाश सुखधाने, सुनील अंभोरे, असीम खान, गणेश अक्कर, संदीप ढोरे, रियाज कुरेशी यांच्यासह अनेक युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
चिखली : ‘पकोडा स्टॉल’ उभारून नोंदविला निषेध निवडणुकीदरम्यान सुशिक्षित बेरोजगारांसाठी वर्षाला दोन कोटी रोजगार निर्मितीचे आश्वासन दिलेले असताना साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याऐवजी त्यांना पकोडे विकण्याचा सल्ला देऊन जखमेवर मीठ चोळण्याचे काम करणार्या भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या वक्तव्याचा चिखली युवक काँग्रेस, एनएसयूआय व युथ बिग्रेडच्यावतीने ‘पकोडा स्टॉल’ उभारून तीव्र निषेध नोंदविला. स्थानिक बसस्थानकासमोर सकाळी १0 ते १ वाजताच्या उपरोक्त संघटनांच्यावतीने ‘पकोडा स्टॉल’ उभारण्यात आले होते. या ठिकाणी पदवीधर व उच्च शिक्षित तरुणांनी पकोडे तळून भेट देणार्यांना नागरिकांना त्याचे वाटप करून सरकार विरोधात नारेबाजी करून आपला रोष व्यक्त केला. त्यावेळी रमेश सुरडकर, पवन गवारे, राम डहाके, अतरोद्दीन काझी, राहुल सवडतकर, गौरव बाविस्कर, मकरंद भटकर, अमोल सुरडकर, तारीख शेख, किशोर कदम, तुषार भावसार, विष्णू जाधव, प्रवीण पाटील, सूचित भराड, पिंटू गायकवाड, अरविंद झाल्टे, लिंबाजी सवडे, रवी सुरडकर, कृष्णा चौथे, दत्ता करवंदे, पवन रेठे, भारत मोरे, भारत मुलचंदानी, संजय गिरी, बाळू साळोख, किशोर साळवे, राजू सावंत, संजय सोळंकी, पप्पू पाटील, भगवान गायकवाड, संदीप सोळंकी, शेख इम्रान, प्रकाश राठोड, संदीप सोळंकी, शुभम पडघान आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह सुशिक्षित बेरोजगारांची उपस्थिती होती.