शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

भविष्याचा वेध घेणाऱ्या प्रश्नांनी गाजला युवा संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 3:08 PM

आमदार रोहित पवार यांनी हा कार्यक्रम एक प्रकारे तरूण तरुणींसाठी एक पर्वणीच ठरावा अशा उंचीवर नेऊन ठेवला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कर्जमाफीपेक्षा शेतमालाला भाव का नाही, औद्योगीक धोरणाशी सुसंगत वर्तमान शैक्षणिक धोरण राबविल्या का जात नाही, यासह भविष्याचा वेध घेत राजकीय कोपरखळ्या करणाºया युवक-युवतींच्या प्रश्नांनी बुलडाण्यात सोमवारी आयोजित युवा संवाद कार्यक्रमात वेगळेच रंग भरल्या गेले. सोबतच युवकांच्या मनातील या प्रश्नांना तितक्याच खुमासदार व अभ्यासपूर्ण उत्तरांनी आमदार रोहित पवार यांनी हा कार्यक्रम एक प्रकारे तरूण तरुणींसाठी एक पर्वणीच ठरावा अशा उंचीवर नेऊन ठेवला.राजश्री शाहू फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप शेळके यांच्या पुढाकारातून स्थानिक जिजामाता महाविद्यालयाच्या मैदानावर तरुणाईच्या मनातील भावना व आशा, आकांक्षांना वाट मिळून त्यांना वर्तमानातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व अन्य क्षेत्रातील करीअरच्या संधी व कल याची माहिती मिळावी यादृष्टीकोणातून हा युवा संवाद कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी संदिप शेळके, भाऊसाहेब शेळके, आशिष रहाटे, मुख्यातरसिंग राजपूत, जयश्री शेळके, रविकांत वरपे, पंकज बोराडे, ज्ञानेश्वर सुसर, शेखर बोंद्रे, सुनिल सपकाळ आदी उपस्थित होते. युवकांशी संवाद साधताना त्यांनी भविष्याचा वेध घेणाºया प्रश्नांचा उलगडा केला. बुलडाण्याला जिजाऊ नगरीचे नाव द्या? या प्रश्नाने सुरूवात झालेल्या युवा संवादात युवक व युवतींनी शिक्षण, शेती यावर अनेक प्रश्न उपस्थित केले. जिजाऊ नगरीचे नाव देण्याच्या प्रश्नावर रोहित पवार यांनी सकारात्मक उत्तर देत युवकांनी ठरवले तर खूप काही बदल होऊन शकतात, त्यासाठी युवकांचे एकत्रिकरण महत्त्वाचे आहे. युवकांच्या एकत्रिकरणातून नवा विचार, नवे राज्य निर्माण होऊ शकते. प्रमुख्याने शिक्षणात आवश्यक असणारे बदलही त्यांनी स्पष्ट केले. इंटरनेटचा वापर शिक्षणासाठी केला, तर विद्यार्थ्यांना अभ्यासात मोठी मदत होईल. एमपीएससी, यूपीएससीसाठी प्रशिक्षाणाठी दिल्लीसारख्या ठिकाणे युवक जातात. त्यामुळे हेच प्रशिक्षण महाराष्ट्रात मिळाले तर मोठा फायदा होऊ शकतो. शासकीय मेडीकल व इंजिनिअर कॉलेजच्या प्रश्नावर त्यांनी बुलडाण्यात येत्या दोन ते तीन वर्षात ह्या सुविधा देण्यात येतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारbuldhanaबुलडाणा