लोकमत न्यूज नेटवर्कपळशी बु. : एका ३० वर्षीय युवकाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथे १ मार्च रोजी घडली. यामुळे पळशी बु. या गावावर शोककळा पसरली आहे.खामगाव तालुक्यातील पळशी बु. येथील सचिन सारंगधर गुरव (वय ३०) हा युवक २८ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान पळशी बु. येथून पत्नी व दोन मुलांसह अकोला जिल्ह्यातील अन्वी मिझार्पुर येथे सासरवाडीत मुक्कामी गेला होता. सचिन व त्याचे सासरे दिलीप लाहाळे हे सोमवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास अन्वी मिझार्पुरवरून काही कामानिमित्त अकोल्याकडे दुचाकीने जात होते. दरम्यान, बोरगाव मंजू गावानजीक त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. यामध्ये सचिनच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मुत्यू झाला असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांकडून देण्यात आली आहे. त्याच्यावर सोमवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास पळशी बु. येथील स्मशानभुमीत अत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, आई, २ भाऊ, १ एक बहीण, २ मुले असा परिवार आहे.
सासुरवाडीला गेलेल्या युवकाचा दुचाकी अपघातात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 12:05 IST