मलकापूरःपुणे जिल्ह्यातील शिरूर नजिक मोटारसायकल अपघातातमलकापूरचा एक युवक ठार,तर एक गंभीर जखमी झाला. रविवारी रात्री हा अपघात घडला. संबधीतांच्या नातेवाईकांनी या माहितीस दुजोरा दिला आहे.यासंदर्भात अधिक माहिती अशी की,मलकापूरातील दोन युवक कार्तिक बंडू आगलावे वय २३ रा.लक्ष्मी नगर व गणेश विनायक भगत रा.सावजी जिनिंग मलकापूर दोघे नोकरीच्या शोधात मोटारसायकलने बाहेर पडले होते.पुणे जिल्ह्यातील शिरूर नजिक त्यांच्या मोटारसायकलीला अद्यात वाहनाने धडक दिली. त्यात कार्तिक आगलावे हा युवक जागीच ठार झाला. तर गणेश भगत हा पायावर गंभीर जखमा झाल्याने त्याला खाजगी दवाखान्यात भरती करण्यात आले आहे.या माहीतीस आगलावे व भगत परिवारातील सदस्यांनी दुजोरा दिला आहे
पुणे जिल्ह्यातील अपघातात मलकापूरचा युवक ठार, एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 12:05 PM