लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगाव मही : येथील भागवत शिंगणे (वय २२) या युवकाने आपल्या शेतात सतत होणारी नापिकी व बेरोजगारीला कंटाळून ठिबक सिंचन नळीने आब्यांच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना ९ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली.भागवत गणेश शिंगणे हा युवक गत काही दिवसांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. नुकत्याच गडचिरोली येथे झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये वेटिंग लिस्टमध्ये भागवतचे नाव होते. घरातील परिस्थिती हलाखीची व वडील सतत आजारी असल्याने घरातील कर्ता म्हणून जबाबदारी त्याच्यावर होती. त्यात सततची नापिकी व बेरोजगारीला कंटाळून आपली जीवन यात्रा संपवली. सदर घटनेची माहिती गणेश शिंगणे यांनी दिल्यावरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सारंग नवलकार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अकिल काझी, गजानन इंगळे, रणवीरसिंग अवचार, संदीप बालोद सुनील सुरडकर करीत आहेत.
बेरोजगारीला कंटाळून युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 1:03 AM
देऊळगाव मही : येथील भागवत शिंगणे (वय २२) या युवकाने आपल्या शेतात सतत होणारी नापिकी व बेरोजगारीला कंटाळून ठिबक सिंचन नळीने आब्यांच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना ९ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली.
ठळक मुद्देसतत होणारी नापिकी व बेरोजगारीला कंटाळून जीवन यात्रा संपविल्याची घटना ठिबक सिंचन नळीने आब्यांच्या झाडाला गळफास