गजानन तिडकेदेऊळगाव राजा (बुलढाणा):
गणेश विसर्जनासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा खडकपूर्णा धरणाच्या बॅक वाॅटरमध्ये बुडाल्याने मृत्यू झाला़ ही घटना देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहांगीर येथे ९ सप्टेंबर राेजी घडली़ बळीराम विनायक बाेबडे असे मृत युवकाचे नाव आहे़. १० सप्टेंबर राेजी सकाळी या युवकाचा मृतदेह सापडला़
सिनगाव जहाॅगीर येथील बळीराम बाेबडे हा युवक गावातील मित्रांसह घरगुती गणेश विसर्जनासाठी नदीवर ९ सप्टेंबर राेजी गेला हाेता़ खडकपूर्णा धरणाचे बॅक वाॅटर सिनगाव जहाॅ़ गावापर्यंत आलेले आहेत़ त्यामुळे, नदीच्या पात्र तुडुंब भरलेले आहे़ गणेश विसर्जनादरम्यान बळीराम बाेबडे याचा पाय घसरुन नदीच्या पात्रात पडला़ त्याचे मित्र भरत वलगरे ,अजय डोईफोडे, अक्षय डोईफोडे ,पवन बोबडे आदींनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला़ मात्र, त्यांना यश आले आले नाही़ घटनेची माहिती त्याच्या मित्रांनी तातडीने पाेलीसांना व ग्रामस्थांना कळविली़ पोलीस निरीक्षक जयवंत सातव यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय वाघमारे आणि पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळावर तात्काळ पाठविले़ गावातील सरपंचपती प्रकाश गिते आणि ५० ते ६० ग्रामस्थांनी रात्री बॅटऱ्या लावून शोध घेतला़ परंतु नदी पात्रात माेठ्या प्रमाणात पाणी असल्याने त्याचा शाेध लागला नाही़ १० सप्टेंबर सकाळी राेजी ग्रामस्थांनी गळाच्या मदतीने शाेध माेहिम राबवली़ त्यामध्ये सकाळी ८ ते ९च्या दरम्यान युवकाचा मृतदेह आढळला़ या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केला आहे़