शनिवारी मेहकर येथील कृषिवैभव लाॅन्समध्ये आयोजित युवासेना पदाधिकारी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. प्रतापराव जाधव हे होते. प्रमुख अतिथी म्हणून आ. संजय रायमुलकर, सहसंपर्कप्रमुख भास्करराव मोरे, आशिष शिरोडकर, अमेय घोले, रूपेश कदम, अभिमन्यू खोतकर, योगेश निमसे, किशोर भोसले, युवासेना जिल्हा अधिकारी ऋषी जाधव, नीरज रायमुलकर, कुणाल गायकवाड, श्रीनिवास खेडेकर, विठ्ठल सराफ, तालुकाप्रमुख सुरेश वाळूकर, बबनराव तुपे, युवासेनेचे भूषण घोडे, संजय खंडागळे आदींची उपस्थिती होती. प्रत्येक युवकाने आपल्या गावामध्ये मतदार यादीमध्ये नागरिकांची नावे समाविष्ट करावी, यादीचे वाचन करावे, नागरिकांपर्यंत जावे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम नागरिकांना पसंत पडले आहे. त्यांच्या नावाचे परिवर्तन तुम्ही मतांमध्ये करा, असे आवाहनही सरदेसाई यांनी यावेळी केले. युवक हा नेहमीच संवेदनशील असतो. त्याने नेहमी युवासेना या माध्यमातून पक्षासाठी काम करावे. शिवसेनेच्या माध्यमातून युवासेनेने चांगले काम करावे, युवकांची फळी निर्माण करावी, युवकांचे प्रश्न मार्गी लावावे, असे आवाहन आ. संजय रायमुलकर यांनी केले. युवासेना जिल्हा अधिकारी ऋषिकेश जाधव यांनी युवासेनेच्या कार्याच्या लेखाजोखा मांडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिद्धेश्वर आंधळे यांनी केले. सूत्रसंचालन जयचंद बाठिया व विशाल काळे यांनी केले. आभार नीरज रायमुलकर यांनी मानले. यावेळी जिल्ह्यातून युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपने विश्वास घात केला : जाधव
भाजपने दिलेला शब्द पाळला नाही. मातोश्रीवर जे काय बोलले ते नंतर बोलायला तयार नाहीत. शिवसेनेचे विधानसभेचे उमेदवार पाडण्यासाठी भाजपने रणनीती आखली. आपण विश्वासावर राहलो आणि भाजपने विश्वास घात केला. युवकांनी लोकांचा विश्वास जिंकावा, असे आवाहन खा.प्रतापराव जाधव यांनी केले.