बुलडाणा: गत वर्षभरापासून काेराेनामुळे आर्थिक उत्पन्नाचे स्त्राेत मर्यादीत झालेले असतानाच २५ मार्च राेजी जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती रियाजखान इलियाजखान पठाण यांनी २१ काेटींचा अर्थसंकल्प सादर केला. काेरेानामुळे ही सभा ऑनलाइनच घेण्यात आली आहे.अर्थसंकल्पामध्ये कृषी,समाज कल्याणसह प्राथमिक आराेग्य केंद्राचा दर्जा सुधारण्यावर भर देण्यात आला आहे.
जिल्हापरिषद चे अर्थ बांधकाम सभापती रियाझ खान पठाण यांनी दुपारी २ वाजताच्या आसपास सुरू झालेल्या ऑनलाईन बैठकीत जिल्हापरिषदे चा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार, उपाध्यक्ष कमल जालिंदर बुधवत, महिला बाल कल्याण सभापती ज्योति अशोक पडघान, समाजकल्याण सभापती पूनम राठोड, कृषी सभापती राजेन्द्र पळसकर, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, मुख्य वित व लेखा अधिकारी शिल्पा पवार आदी उपस्थित हाेते.
महाराष्ट जिल्हा परिषद व पंचायम समिती अधिनियम १९६१च्या कलम १३७ नुसार बुलडाणा जिल्हा परिषदेचे सन २०२०-२१ चे सुधारीत आणि २०२१-२२चे मुळ अंदाजपत्रक प्राप्तीचे व खर्चाचे तयार करण्यात आले आहे. शासनाने विहीरीत केलेल्या टक्केवारीनुसार मागासवर्गीयांच्या कल्याणकारी याेजनांसाठी २० टक्के निधी, महिला व बालकल्याणच्या याेजनांसाठी १० टक्के निधी, ग्रामीण पाणी पुरवठज्ञ याेजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी २० टक्के निधीची तरतुद करण्यात आली आहे. तसेच दिव्यांगाच्या कल्याणासाठी समाज कल्याण विभागासाठी ५ टक्के व शिक्षणविभागांतर्गंत शाळा दुरुस्तीसाठी ५ टक्के तूरतूद करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेेने उत्पन्न वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करून सन २०२०-२१चे सुधारीत अंदाजपत्रक ३० काेटी ३९ लाख ५० हजार ७९८ व सन २०२१-२२चे मुळ अंदाजपत्रक २१ काेटी ३ लाख १६ हजार ५९३ चे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण ऑनलाइन सभेत सादर करण्यात आला आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या विकासात्मक दृष्टीकाेनातून व्यक्तीगत लाभाच्या याेजना, शेती औजारे, व उपकरणे यासाठी ७५ टक्के अनुदानाच्या याेजना तसेच शेतकऱ्यांसाठी पशुधनाकरीता विकासासाठी भरीव तरतुद करण्यात आली आहे. तसेच महिला व बाल विकासाच्या अनुषंगाने ग्रामीण भागातील महिला व मुलींना विधीविषयक, व्यवसायीक व तांत्रिक प्रशिक्षणाच्या अनुषंगाने भरीव स्वरुपाची तरतुद करण्यात आली आहे. तसेच काेविड सारख्या साथराेगाचे निवारण करण्याच्या दृष्टीने व प्राथमिक केंद्राचा दर्जा उंचावणण्याच्या दृष्टीपे साथ राेग निवारण व आराेग्य केंद्राची देखभाल दुरुस्ती या बाबीवर ही तरतुद करण्यात आली आहे.
अर्थसंकल्पातील ठळक बाबी
काेविड सारख्या साथराेग कालावधीत औषध व प्राथिमक आराेग्य केंद्राचा दर्जा सुधारण्यावर भर
समाज कल्यास विभागास जि.प.नियमानुसार २० टक्के उत्पन्नाच्या अधीन राहुन १०० टक्के अनुदानावर व्यक्तीगत लाभाच्या याेजना.
महिला बाल कल्याणासाठी शासनाचे १० टक्के निकषानुसार महिला सक्षमीकरणावर भर
शिक्षण विभागास माेडकळीस आलेल्या शाळांच्या दृष्टीने तरतूद
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पातुर्डा बु व माॅ जिजाउ यांच्या उत्सवास आणि चाेखा मेळा यांच्या जन्मस्थळासाठी भरीव तरतुद करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठी ७५ टक्के अनुदानावर शेतीविषयक साहित्य व औजारे विषयक लाभाच्या याेजना
जिल्हा परिषदेचे शिलकीचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले.
अर्थसंकल्पावर आॅनलाइन चर्चा
कोरोनाचा प्रकोप व शासनाचे निर्देश लक्षात घेता सर्व पदाधिकारी व सदस्य ' झूम अप' द्वारे बैठकीत व चर्चेत सहभागी झालेत. जिल्ह्यातील १३ पंचायत समितीमध्ये यासाठी तांत्रिक व्यवस्था करण्यात आली हाेती. संबंधित तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य त्या ,त्या पंचायत समिती मध्ये उपस्थित होते. यामुळे बैठकी दरम्यानची चर्चा , खडाजंगी, टीका टिपण्णी सर्व ऑनलाइनच रंगले!