बुलडाणा: मिनीमंत्रालय म्हणून ओळख असलेल्या बुलडाणा जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक ५ एप्रिल रोजी येथील शिवाजी सभागृहात पार पडली. यामध्ये सत्तेच्या वाटाघाटी फॉर्म्युल्यानुसार भाजपाच्या वाट्याला तिन व राष्ट्रवादीच्या वाट्याला एक सभापती पद आले आहे. त्यामध्ये अर्थ, बांधकाम, महिला-बालकल्याण व समाज कल्याण विभागाचे सभापतीपद भाजपाच्या वाट्याला, तर आरोग्य व पशुसंवर्धन सभापतीपद राष्ट्रवादीच्या वाट्याला आले आहे. दोन सभापती घाटावरील, तर दोन सभापती घाटाखालील आहेत. दिनकर बापू देशमुख यांना कृषी व पशुसंवर्धन, श्वेताताई महाले यांना महिला-बालकल्याण, तर राजेंद्र उमाळे यांना अर्थ व बांधकाम सभापतीपद मिळाले आहे.
जिल्हा परिषद सभापती पद : तीन भाजप, एक राष्ट्रवादीच्या वाट्याला
By admin | Published: April 05, 2017 7:28 PM