लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: एकाचवेळी एमएड महाविद्यालय आणि शाळेवरही हजर असल्याचे दाखवून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या कल्पना ठग नामक शिक्षिकेस माहिती पुरविण्याबाबत जिल्हा परिषदेने कमालीची तत्परता दाखविली. तसेच पोलिसांनीही तत्काळ अभिप्राय नोंदवून आरोपी शिक्षिकेस अप्रत्यक्ष सहकार्य केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.सोनाळा येथील जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत शिक्षिका कल्पना भगवान ठग यांनी पंचायत समिती बुलडाणा अंतर्गत चिखला येथील मराठी पूर्व माध्यमिक शाळा येथे कार्यरत असताना सन २0१२-१३ मध्ये नियमित बीएड अभ्यासक्रमासाठी तर २0१३-१४ मध्ये एमएड अभ्यासक्रमासाठी शाहू महाराज महाविद्यालय माळविहीर ये थे प्रवेश घेतला होता. यासाठी त्यांनी कोणत्याही सक्षम अधिकार्यांची परवानगी घेतली नाही, तर दुसरीकडे चिखला येथील शाळेतील हजेरीपत्रकावर आणि महाविद्यालयाच्या हजेरीपत्रकावरसुद्धा सह्या करून शासनाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे याप्रकरणी तक्रार झाल्यानंतर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश शासनाने दिले. यावरून ४ सप्टेंबर २0१७ रोजी कलम ४२0 भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला; पण याबाबत गोपनीयता न बाळगण्यात आल्याने गटशिक्षणाधिकारी मदन आंधळे यांनी तक्रार देण्यापूर्वीच ठग यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज न्यायालयात दाखल केला होता. न्यायालयाने पोलीस प्रशासनाला ठग यांना अटक करण्यापूर्वी नोटीस देऊन ७२ तासांची मुदत देण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, ठग यांनी जामिनाकरिता काही कागदपत्रे मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेत शिक्षण विभागाकडे माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज करून मागणी केली असता त्यांना अवघ्या २४ तासांत संबंधित कागदपत्र देण्यात आले. माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागितली असता त्यांना महिनोगणती माहिती दिली जात नसल्याची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत.
आरोपी शिक्षिकेस माहिती देण्याबाबत जिल्हा परिषदेची तत्परता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:20 AM
एकाचवेळी एमएड महाविद्यालय आणि शाळेवरही हजर असल्याचे दाखवून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या कल्पना ठग नामक शिक्षिकेस माहिती पुरविण्याबाबत जिल्हा परिषदेने कमालीची तत्परता दाखविली. तसेच पोलिसांनीही तत्काळ अभिप्राय नोंदवून आरोपी शिक्षिकेस अप्रत्यक्ष सहकार्य केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
ठळक मुद्देशिक्षिका कल्पना ठग प्रकरण पोलिसांनीही तत्काळ नोंदविला अभिप्राय