बुलडाणा: जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवा जेष्ठता यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील २१५ कर्मचाºयांचा समावेश असून, ग्रा.पं. कर्मचाºयांच्या तात्पुरत्या सेवा जेष्ठता यादीवर आक्षेप नोंदविण्यासाठी १५ आॅगस्टची मुदत जिल्हा परिषद कडून देण्यात आली आहे.गाव पातळीवर विविध योजना राबविण्यासाठी ग्रामपंचायत महत्त्वाची भूमीका बजावत असते. त्यासाठी ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, विस्तार अधिकारी (ग्रां.प.) यांचे आस्थापना विषयक जि. प. स्तरांवरील सर्व कामे, ग्रामपंचायत कर्मचाºयांना आकृतीबंधाप्रमाणे सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध करणे, कंत्राटी ग्रामसेवक भरती संबंधी कार्यवाही करणे, त्यांना तीन वर्षानंतर नियमीत ग्रामसेवक पदावर सामावुन घेणे, असे अनेक कामे ग्रामपंचायत विभागाकडून चालत असतात. जिल्हा परिषद विभत्तगाकडून ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचाºयांची तात्पुरती सेवा जेष्ठता यादी १ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषदच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील २१५ कर्मचाºयांचा समावेश आहे. या यादीमध्ये ग्रामपंचायत कर्मचाºयाचे नाव, ग्रामपंचायतचे नाव, पंचायत समितीचे नाव, ग्रामपंचायत सेवेत रुजू झाल्याची तारीख, ग्रामपंचायतच्या ठरवाचा उल्लेख, १० वर्ष सलग सेवा पूर्ण झाल्याची तारीख, जेष्ठता तारीख, शैक्षणिक पात्रता, पत्रव्यवहार करूनही कागदपत्र प्राप्त होत नसल्याबाबतचा तपशिल यासह विविध बाबींचा उल्लेख या सेवाजेष्ठता यादीमध्ये करण्यात आल्याचे दिसून येते. जिल्हा परिषद अंतर्गत करण्यात आलेल्या ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या तात्पुरत्या सेवा जेष्ठता यादीवर १५ आॅगस्टपर्यंत आक्षेपही नोंदविता येणार आहेत. आक्षेप पडताळणीनंतर पुन्हा अंतीम यादीग्रामपंचायत कर्मचाºयांच्या तात्पुरत्या सेवा जेष्ठता यादीवर लेखी स्वरूपात आक्षेप आवश्यक पुराव्याच्या कागदपत्रासह मागविण्यात आलेले आहेत. ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या सेवा जेष्ठता यादीवर आलेल्या आक्षेपाची तडताळी करून ग्रामपंचायत कर्मचाºयांची यादी अंतीम करण्यात येणार असल्याची जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिली आहे.
जिल्हा परिषदच्या तात्पुरत्या सेवा जेष्ठतेमध्ये २१५ कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 6:22 PM