नवी दिल्ली : ग्राहकांचा खर्च आणि अर्थव्यवस्थेवरील विश्वास वाढल्यामुळे, क्रेडिट कार्ड विक्री, वैयक्तिक वित्त, बँकिंगमधील किरकोळ विमा, वित्तीय सेवा आणि विमा म्हणजेच बीएफएस (BFSI) क्षेत्रात तेजी आहे. टीमलीजच्या अहवालानुसार, २०२३ च्या उत्तरार्धात सुमारे ५०,००० तात्पुरत्या नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
बीएफएसआय क्षेत्राच्या दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न केल्यास सणासुदीच्या काळात तात्पुरत्या कामगारांची मागणी केवळ अहमदाबाद, पुणे, बंगळुरू, कोलकाता यांसारख्या टियर-1 शहरांमध्येच नाही तर कोची, विझाग, मदुराई, लखनौ, चंदीगड, अमृतसर, भोपाळ, रायपूर यासारख्या टियर-2 आणि टियर-3 शहरांमध्येही सतत वाढ दिसून येत आहे.
क्रेडिट कार्ड व्यवहार वाढत आहे, पर्सनल फायनान्स अॅप्लिकेशन्स वाढत आहेत आणि भारताची डिजिटल पेमेंटची परिस्थिती भरभराट होत आहे. आम्ही पुढील पाच-सहा महिन्यात एक गतिमान जॉब्स मार्केट पाहत आहोत. गेल्या दोन महिन्यांत, आम्ही तात्पुरत्या कर्मचार्यांच्या पोस्टसाठी अंदाजे २५,००० नोकऱ्यांच्या संधी पाहिल्या आहेत आणि येत्या काही महिन्यांत ही संख्या वाढण्याची आम्हाला अपेक्षा आहे, असे बीएफएस टीमलीज सर्व्हिसचे उपाध्यक्ष आणि व्यवसाय प्रमुख कृष्णेंदू चॅटर्जी यांनी सांगितले. तसेच, या सणासुदीच्या काळात वाढलेल्या ग्राहक क्रियाकलापांची पूर्तता करण्यासाठी BFSI क्षेत्रामध्ये भरतीमध्ये वाढ होत आहे, असे अहवालात नमूद केले आहे.
किती मिळतोय पगार या पदांवरील तात्पुरत्या कर्मचाऱ्यांच्या कमाईत गेल्या वर्षीच्या तुलनेत ७-१० टक्क्यांनी वाढ झाली आहे. टीमलीजच्या अहवालानुसार, दिल्लीमध्ये ऑन-द-फीट पोस्टसाठी पॅकेज २०,००० ते २२००० रुपये, कोलकातामध्ये १६,००० ते १८,००० रुपये, मुंबईमध्ये २०,००० ते २२,००० रुपये, चेन्नईमध्ये १८,००० ते २०,००० रुपये आणि बंगळुरूमध्ये २०,००० ते २२,००० रुपये यादरम्यान आहे.
कामगारांची गरज कशी?कृष्णेंदू चॅटर्जी म्हणाले की, सणासुदीच्या काळात बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्र आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी कुशल आणि ग्राहक-केंद्रित कर्मचार्यांच्या शोधात आहे. वेळेचे व्यवस्थापन आणि उच्च स्तरीय ग्राहक सेवा प्रदान करण्यात त्याचे कौशल्य त्याला क्रेडिट कार्ड अॅप्लिकेशन हाताळण्यास आणि विक्री, वैयक्तिक कर्जे वाढविण्यास सक्षम करेल, ज्यामुळे कंपनीच्या यशात आणि ग्राहकांच्या समाधानात योगदान मिळेल. सणासुदीच्या काळात क्रेडिट कार्ड, पर्सनल फायनान्स आणि विमा उत्पादनांची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे.