तरुण विद्यार्थ्यांच्या भविष्याचा मार्ग सुकर करण्यासाठी मदत म्हणून सरकारी शाळांमध्ये एक महत्त्वपूर्ण मोहीम चालवण्यात आली. तब्बल ५ हजार विद्यार्थ्यांवर याचा सकारात्मक परिणाम झाला. आयआयटी मुंबईच्या नेतृत्वाखालील या मोहिमेनं माहितीतील तफावत भरून काढण्याचा आणि तरुणांना करिअरची महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे निश्चित करण्यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न केला.
आयआयटी मुंबईच्या ७० पेक्षा अधिक स्वयंसेवकांच्या टीमनं शुक्रवार दिनांक २७ ऑक्टोबर रोजी या मोहिमेचं आयोजन केलं होतं. प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिकरित्या आणि संबंधित सल्ले मिळतील याची खात्री करण्यासाठी अभ्युदय टीमने अथक प्रयत्न केले.
हा कार्यक्रम विविध पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांच्या गरजा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी डिझाइन करण्यात आला होता. या मोहिमेचा परिणाम असा झाला की, जे विद्यार्थी प्रथमच या क्षेत्रात येणार आहेत, त्यांना या प्रोफेशनचा समग्र दृष्टिकोन मिळाला. विविध उद्योग, आवश्यक कौशल्य आणि संभाव्य करिअर मार्गांची सर्वसमावेशक माहिती देऊन, मोहिमेने विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवासाबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम केलं.
"प्रत्येक विद्यार्थ्याला मोठी स्वप्ने पाहण्याची आणि त्यांच्या आवडींचा पाठपुरावा करण्याची संधी मिळाली पाहिजे असा आमचा विश्वास आहे. ही मोहीम ते प्रत्यक्षात साकार करण्याच्या दिशेनं एक लहान पाऊल होतं. विद्यार्थी आणि शिक्षक दोघांच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आम्ही आभारी आहोत," अशी प्रतिक्रिया टीम अभ्युदयनं दिली.
या मोहिमेचं यश हे अभ्युदय टीमच्या एकत्रित प्रयत्नाचे आणि त्यात सहभागी असलेल्या सरकारी शाळांच्या सहकार्याचा परिणाम आहे. योग्य पाठिंबा मिळाल्यास विद्यार्थी आव्हानांवर मात करू शकतात आणि त्यांची स्वप्नं पूर्ण करू शकतात हा विश्वास दृढ करतो. जसा या मोहिमेचा समारोप होईल, अभ्युदय, आयआयटी मुंबई याला पुढे नेण्यासाठी देशभारतील तरुण वर्गाला समर्थन आणि सशक्त बनवण्यासाठी, तसंच निरनिराळे पर्याय शोधण्यासाठी तत्पर आहे.
अभ्युदय आणि त्यांच्या उपक्रमांबद्दल अधिक माहितीसाठीॉ कृपया @iitbombay_abhyuday ला भेट द्या.