शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
4
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
5
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
6
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
7
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
8
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
9
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
10
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
11
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
12
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
13
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
14
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
15
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
16
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
17
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
18
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
19
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
20
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स

जाहिरातीची दुनिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 2:38 AM

वस्तू विकायची म्हणजे त्याची जाहिरात ही करावीच लागते. उत्पादनाची चर्चा सतत सुरू ठेवावी लागते. त्यासाठी जाहिरात ही एक कला आहे.

वस्तू विकायची म्हणजे त्याची जाहिरात ही करावीच लागते. उत्पादनाची चर्चा सतत सुरू ठेवावी लागते. त्यासाठी जाहिरात ही एक कला आहे. मात्र, ती सर्वांनाच साधते असे नाही. त्यासाठी सर्जनशीलतेची आवश्यकता असते. जाहिरातीवर करोडो रुपये कसे खर्च केले जातात, हे आपण दूरचित्रवाणीवर पाहतोच, पण या लोकार्षक जाहिराती तयार करणे हे वाटते तितके सोपे काम नाही. त्यातही अंगभूत कौशल्य असावे लागते. आता संगणकाची मदत घेऊन आकर्षक जाहिराती तयार करता येतात. त्यासाठी विविध सॉफ्टवेअरदेखील आहेत. जाहिरात तयार करणाऱ्यांवरही उत्पादक बºयापैकी पैसा खर्च करत आहेत. अर्थात, ती त्यांची एक प्रकारची गुंतवणूकच असते.माध्यम जगतात जाहिरात क्षेत्रात करिअर करण्याची संधी आज चांगल्या प्रकारे उपलब्ध आहे. दिवसागणिक प्रशिक्षित तज्ज्ञांना मागणी वाढत जाणार आहे, हे निश्चत, पण त्यासाठी दर्जेदार संस्थेतून प्रशिक्षण घेतले पाहिजे, हे ओघाने आलेच. सुदैवाने भारतात काही दर्जेदार प्रशिक्षण संस्थाही आहेत, पण त्यात वर्णी लागणे महत्त्वाचे आहे. यात अहमदाबादमधील मुद्रा इन्स्टिट्यूट आॅफ कम्युनिकेशन या संस्थेचा क्रमांक वरचा आहे. या संस्थेतर्फे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कम्युनिकेशन मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम घेतला जातो. यात ब्रँड मार्केटिंग, अ‍ॅडव्हर्टायझिंग, मीडिया अँड मार्केटिंग रिसर्च हे विषय शिकविले जातात. कोणत्याही ज्ञानशाखेचे पदवीधर किंवा अंतिम वर्षाला शिकत असलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशपरीक्षेला बसू शकतात. हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम आहे, पण ही संस्था सिंगापूरच्या नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी स्कूल आॅफ कम्युनिकेशन आणि फ्रान्सच्या स्कूल आॅफ मॅनेजमेंटशी टाय-अप आहे. त्यामुळे या संस्थेच्या विद्यार्थ्यांना त्या संस्थांमध्ये अभ्यासक्रमकरण्याची म्हणजे एक्स्चेंजची संधी मिळू शकते.अहमदाबादच्या मुद्राप्रमाणे मुंबईतही लिंटास मीडिया सर्व्हिसमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन अ‍ॅडव्हर्टायझिंग मीडिया मॅनेजमेंट हा दीड वर्षाचा अभ्यासक्रम आहे. कर्नाटकमधील इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटचा करस्पॉन्डन्स कोर्सही आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर कॉपीरायटिंग, आर्ट डायरेक्शन, मीडिया प्रॉडक्शन अकाउंट मॅनेजमेंट, प्लॅनिंग अँड रिसर्च, सेल्स प्रमोशन, पब्लिक रिलेशन, अ‍ॅड फिल्ममेकिंग अशा क्षेत्रांत स्वत:चे करिअर करता येते. थोडक्यात, रीतसर प्रशिक्षण, स्वत:च्या चाणाक्ष वृत्तीचा वापर, कल्पकतेचा वापर आणि मेहनत घेतली, तर या क्षेत्रात सुवर्णसंधी आहे. कारण जाहिरात हे क्षेत्र सातत्याने विस्तारत जाणारे आहे.संस्थांचे पत्ते :मुद्रा इन्स्टिट्यूट आॅफ कम्युनिकेशन, शेला, अहमदाबाद - ३८००५८लिंटास मीडिया सर्व्हिस, नॉर्थ पॉइंट सेंटर आॅफ लर्निंग, मुंबई सेंटर, १५वा मजला, एक्स्प्रेस टॉवर्स, नरिमन पॉइंट, मुंबई - ४०००२१इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट, २८३ (डीईपीटी सी ४१) फर्स्ट ब्लॉक, आर. टी. नगर, बंगलुरू - ५६००३२.नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅडव्हर्टायझिंग, ९ इन्स्टिट्यूशन एरिया, लोधी रोड, नवी दिल्ली - ११०००३.