Airforce Agniveer Recruitment 2023:वायुसेनेत नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय वायुसेनेने अग्निवीर वायु भरतीची नोटीफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे. या संदर्भात उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. यात तरुण आणि तरुणीही अर्ज करु शकतात.
देशभरात अग्निवीरच्या माध्यमातून नौदलात भरतीची प्रक्रिया सुरू आहे, आता वायुदलातही भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. १७ मार्च २०२३ पासून ते ३१ मार्चपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकता. वायुसानेसाठी लेखी परीक्षा २० मे रोजी होणार आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी agnipathvayu.cdac.in संकेतस्थळावर भेट द्या.
ज्या उमेदवारांनी 12वीमध्ये गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी विषयांसह 50% गुण मिळवले आहेत ते अर्ज करू शकतात. किंवा उमेदवाराकडे तीन वर्षांची अभियांत्रिकी पदविका पदवी असावी. आणि इतर विषयांसाठी, कोणत्याही विषयात 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा
अग्निवीर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २१ वर्षांपेक्षा जास्त नसावे. उमेदवाराची जन्मतारीख 26 डिसेंबर 2002 ते 26 जून 2006 दरम्यान असावी.
भरतीसाठी विहित शारीरिक पात्रतेनुसार, पुरुष उमेदवारांची उंची किमान 152.5 सेंटीमीटर आणि महिला उमेदवारांची उंची 152 सेंटीमीटर असावी. भरती अंतर्गत, उमेदवारांची निवड लेखी चाचणी, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणीद्वारे केली जाईल.