नवी दिल्ली : भारतीय नौदलातनोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरूणांसाठी एक संधी आहे. भारतीय नौदलाने जवळपास ३०० शिकाऊ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यामध्ये विविध प्रकारच्या नोकऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे भारतीय नौदलात विविध पदावर काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेवारांना अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मे आहे. यानंतर इच्छुक अर्जदार अर्ज करू शकणार नाहीत.
उमेदवार indiannavy.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. २४ एप्रिलपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीमध्ये फिटरसाठी ५० पदे, मेकॅनिकसाठी ३५ पदे, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकसाठी २६ पदे, जहाज चालक मुलींसाठी १८ पदे, वेल्डरसाठी १५ पदे, मशिनिस्टसाठी १३ पदे, एमएमटीएमसाठी १३ पदांसाठी भरती होणार आहे.
यासह पाईप फिटरसाठी १३ पदे, पेंटरसाठी ९ पदे, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकसाठी ७ पदे, शीट मेटल वर्करसाठी ३ पदे, टेलर (जी) साठी ३ पदे, पॅटर्न मेकरसाठी २ आणि फाउंड्रीमनच्या एका पदासाठी भरती जारी केले आहे. याशिवाय इतरही अनेक पदांवर अनेक पदे रिक्त आहेत. या नोकऱ्यांसाठी अर्ज करण्यासाठी नॉन-आयटीआय ट्रेडसाठी ८ वी उत्तीर्ण आणि फोर्जर हीट ट्रीटरसाठी १० वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. निवड प्रक्रियेत प्रथम लेखी परीक्षा होईल. लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अर्जदारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
मुलाखतीत निवडलेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाईल. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ७७०० ते ८०५० रुपये मानधन मिळणार आहे. याचबरोबर, या पदांसाठी वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास अर्जदाराचे वय १४ ते १८ वर्षे दरम्यान असावे. यासह प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराची उंची १५० सेमी आणि वजन ४५ किलो पेक्षा कमी नसली पाहिजे. याव्यतिरिक्त आणखी माहिती जाणून घेण्यासाठी नौदलाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.