नवी दिल्ली : भारतीय सैन्यात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. विशेष बाब म्हणजे 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारही या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. आसाम रायफल्समध्ये ही भरती होत आहे. अशा परिस्थितीत, किती जागा रिक्त आहेत आणि कोण अर्ज करू शकेल, याची सर्व माहिती तुम्ही येथे तपासू शकता.
आसाम रायफल्सने एक अधिसूचना जारी करून रायफलमन आणि इतर पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. याद्वारे एकूण 95 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये रायफल मॅनच्या 81, हवालदार लिपिकाच्या 1, वॉरंट ऑफिसरच्या 2, रायफलमन आर्मरच्या 1 आणि इतर रायफल मॅनच्या 10 पदांचा समावेश आहे.
अर्ज कोठे करावा?इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खालील पत्त्यावर पाठवावा-Directorate General Assam Rifles (Recruitment Branch) Laitkor, Shillong Meghalaya – 793010
लक्षात असू दे की, अर्ज 22 जानेवारी 2023 पर्यंत दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे. तसेच, 11 फेब्रुवारी रोजी भरतीसाठी मेळावा आयोजित केला जाईल.
आसाम रायफल्स भरतीसाठी उमेदवाराची पात्रतारायफलमन जनरल ड्युटी – 10वी पासहवालदार लिपिक – टायपिंग स्पीडसह 12वी पासरेडिओ मेकॅनिक - रेडिओ आणि टेलिव्हिजन डिप्लोमासह 10 वी उत्तीर्णड्राफ्ट्समन – 12वी पासरायफलमॅन वॉशरमन – 10वी पाससुतार, स्वयंपाकी, सफाई कामगार – 10वी पास
उमेदवारांची वयोमर्यादाआसाम रायफल्सच्या पदांसाठी विहित वयोमर्यादा 18-23 वर्षे आहे. मात्र काही पदांसाठी ते 18 ते 25 वर्षे आहे.