Bank Job 2021: बँकेत नोकरीची इच्छा असणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर पदावर बंपर भरतीची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच १ सप्टेंबर २०२१ पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्याbankofmaharashtra.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत नोटिफिकेशननुसार बँकेच्या स्पेशालिस्ट ऑफिसर पदासाठी एकूण १९० जागांवर भरती केली जाणार आहे. अर्ज करण्याची १९ सप्टेंबर २०२१ ही शेवटची तारीख आहे. दरम्यान, या भरतीसाठीच्या परीक्षेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. इच्छुक उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत स्थळावर जाऊन नोटिफिकेशन जरुर वाचावं.
कसा कराल अर्ज?१. इच्छुकांनी सर्वातआधी bankofmaharashtra.in या संकेतस्थळावर भेट द्यावी
२. संकेतस्थळाच्या होम पेजवर Recruitment पर्यायावर क्लिक करा
३. त्यानंतर Career in BOM पर्यायावर क्लिक करा
४. यात RECRUITMENT OF SPECIALIST OFFICERS IN SCALE I & II या लिंकवर क्लिक करा
५. त्यानंतर विचारण्यात आलेली संपूर्ण माहिती भरा आणि रजिस्ट्रेशन करा
६. रजिस्ट्रेशननंतर अर्ज दाखल करता येऊ शकतो.
७. थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरीची माहितीबँक ऑफ महाराष्ट्रकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार एकूण १९० जागांवर भरती केली जाणार आहे. यात अॅग्रीकल्चर फील्ड ऑफिसर पदासाठी १०० जागा भरल्या जाणार आहेत. यासोबतच सिक्युरिटी ऑफिसर पदासाठी १० जागा, कायदे विभागासाठी १० जागा, पर्सनल ऑफिसर पदासाठी १०, विंडोज अॅडमिनिस्ट्रेटरसाठी १२ जागांसह इतर पदांवर भरती केली जाणार आहे. यात खुल्या गटासाठी ९३ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. याशिवाय ईडब्ल्यूएक प्रवर्गासाठी १८, ओबीसीसाठी ४६, एससी प्रवर्गासाठी २४ आणि एसटी प्रवर्गासाठी ९ जागा आरक्षित आहेत.
अर्जाचं शुल्कबँकेच्या स्पेशालिस्ट ऑफिसर पदासाठीच्या जागेसाठी ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना ११८० रुपये अर्ज शुल्क भरावं लागणार आहे. तर एससी, एसटी प्रवर्गासाठी ११८ रुपये शुल्क भरावं लागेल. अर्जाचं शुल्क डेबिट किंवा क्रेडिट कार्डनं नेट बँकिंगद्वारे भरता येणार आहे.