नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. तरुणांना सरकारी बँकेत थेट मॅनेजर होण्याची सुवर्णसंधी मिळत आहे. बँक ऑफ बडोदामध्ये पदवीधर तरुणांना नोकरीची संधी आहे. बँकेत ब्रांच रिसिवेबल मॅनेजर या पदासाठी भरतीप्रक्रिया सुरू केली आहे. एकूण 159 पदांवर ही भरती केली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेदरम्यान, महाराष्ट्र आणि गोव्यासह उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि बिहारमध्येही भरती केली जाईल.
इच्छुक उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. 14 एप्रिल ही शेवटची तारीख असून या पदासाठी अर्ज करता येऊ शकेल. कोणत्याही विद्यापीठातून पदवीधर असणारे उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतात. सोबत बँकेत किंवा वित्तीय संस्थांमध्ये किंवा संबंधित कार्यालयात काम केलेल्या व्यक्तीही या पदासाठी अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
14 एप्रिल 2022
'या' पदासाठी भरती
ब्रांच रिसिवेबल मॅनेजर
एकूण जागा
159
वयोमर्यादा
23 ते 35 वर्ष
शैक्षणिक पात्रता
- कोणत्याही विद्यापीठातून पदवीधर असणारे उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतात.
- बँकेत किंवा वित्तीय संस्थांमध्ये किंवा संबंधित कार्यालयात काम केलेल्या व्यक्तीही या पदासाठी अर्ज करू शकतात.
- वित्तीय संस्थेत दोन वर्ष काम केल्याचा अनुभव या पदासाठी गरजेचा आहे.
कुठे करायचा अर्ज?
बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीनं उच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात.
'या' ठिकाणी भरती
महाराष्ट्र गोवाउत्तर प्रदेशराजस्थान दिल्लीहरियाणापंजाबबिहारएका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.