मुंबई - बँक ऑफ बडोदामध्ये हेड मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर आणि सीनियर मॅनेजर या पदांसाठी भरती प्रक्रिसा सुरू करण्यात आली असून, त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीप्रक्रियेसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार २३ फेब्रुवारी ते १५ मार्च या काळात उमेदवारी अर्ज मागवू शकतात. भरती प्रक्रियेचे नोटिफिकेशन सर्व आवश्यक माहितीसह बँकेचे अधिकृत संकेतस्थळ असलेल्या bankofbaroda.in वर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या नोटिफिकेशनमध्ये रिक्त पदांचे विवरण, महत्त्वपूर्ण तारखा, पात्रता, निवड प्रक्रिया आणि अन्य डिटेल्स पाहून इच्छुन उमेदवार अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेमधील वेगवेगळ्या पदांसाठी निर्धारित करण्यात आलेली पात्रता वेगवेगळी आहे. मात्र किमान शैक्षणिक पात्रतेमध्ये पदवी अनिवार्य आहे. तसेच या पदांसाठी वयोमर्यादाही वेगवेगळी आहे. निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीनंतर दरमहा १.४८ लाख ते १.७८ लाख रुपयांपर्यंत मासिक वेतन मिळेल. अर्ज केल्यानंतर उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून होईल. उमेदवारांच्या संख्येच्या आधारावार मेरिट लिस्सट तयार केली जाईल.
या भरतीप्रक्रियेसाठी उमेदवारांना bankofbaroda.co.in/Careers वर जाऊन रिक्रूटमेंटच्या लिंकवर जाऊन क्लिक करावे लागेल. उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून शुक्ल जमा करू शकता. नोटिफिकेशनच्या लिंकसोबत अर्जाची लिंकसोबत अर्जाची लिंक देण्यात आली आहे. Apply Now वर क्लिक करून आपली सविस्तर माहिती नोंदवून रजिस्ट्रेशन पूर्ण करू शकता. अन्य सर्व माहिती उमेदवार नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता.