बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. स्केल २ आणि स्केल ३ च्या अधिकारी पदांवर ही भरती करण्यात येत आहे. यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रने अधिसुचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार १३ जुलैपासून अर्ज करू शकणार आहेत.
उद्यापासून अधिकृत वेबसाईट Bankofmaharashtra.in वर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. याची अंतिम तारीख २५ जुलै २०२३ असणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्र मधील एकूण 400 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यापैकी 100 रिक्त पदे अधिकारी श्रेणी III साठी आहेत आणि 300 रिक्त पदे अधिकारी श्रेणी II साठी आहेत. UR/EWS/OBC प्रवर्गातील उमेदवारांना 1180 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर SC/ST उमेदवारांसाठी नोंदणी शुल्क रुपये 118 आहे.
31 मार्च 2023 रोजी उमेदवारांचे वय स्केल II साठी किमान 25 वर्षे आणि कमाल 35 वर्षे आणि स्केल III साठी 25 ते 38 वर्षे असे निश्चित करण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता...मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील सर्व सेमिस्टरच्या एकूण किमान ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी. JAIIB आणि CAIIB उत्तीर्ण होणे देखील आवश्यक आहे. CA/CMA/CFA सारखी व्यावसायिक पात्रता देखील असणे आवश्यक आहे.
उमेदवारांची निवड ऑनलाइन चाचणी आणि वैयक्तिक मुलाखतीद्वारे केली जाईल. निवडलेले उमेदवार 02 वर्षांच्या बाँडवर स्वाक्षरी करतील. तसेच 06 महिन्यांच्या प्रोबेशन कालावधीवर असतील.