नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. बँक ऑफ बडोदामध्ये अनेक पदांसाठी भरती होत आहे. बँक ऑफ बडोदा (BOB) ने कॉर्पोरेट आणि संस्थात्मक क्रेडिट विभागासाठी स्पेशलिस्ट ऑफिसर (SO) पदांसाठी भरती होणार असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये एकूण 325 पदांची भरती करण्यात येणार आहेत. उमेदवारांना रिलेशनशिप मॅनेजर, क्रेडिट, क्रेडिट एनालिस्ट कॉर्पोरेट म्हणून नियुक्त केले जाईल.
बँक ऑफ बडोदा एसओ पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया बँकेच्या अधिकृत वेबसाईट bankofbaroda.in वर आधीच सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी 12 जुलै 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत. यशस्वीरित्या अर्ज केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेसाठी बोलावले जाईल, ज्याची तारीख नंतर जाहीर केली जाईल.
महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्जाची तारीख – 22 जून 2022 पासून सुरूऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जुलै 2022
'या' पदांची केली जाणार भरती
रिलेशनशिप मॅनेजर- 75 कॉर्पोरेट आणि संस्था क्रेडिट - 100 क्रेडिट एनालिस्ट - 100 कॉर्पोरेट आणि संस्था क्रेडिट – 50
शैक्षणिक पात्रता
रिलेशनशिप मॅनेजर या पदासाठी उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. क्रेडिट एनालिस्ट या पदासाठी, उमेदवारांकडे फायनान्स विषयातील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. अधिक तपशीलांसाठी उमेदवार नोटीफिकेशन तपासू शकतात.
पगार किती?
कॉर्पोरेट आणि संस्था क्रेडिट - 69,180 रुपयेक्रेडिट एनालिस्ट, कॉर्पोरेट आणि संस्था क्रेडिट - 78,230 रुपयेरिलेशनशिप मॅनेजर – 89,890 रुपये
अर्ज कसा करायचा?
BOB च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या (http://www.bankofbaroda.co.in).स्पेशलिस्ट ऑफिसर रिक्रूटमेंट 2022 शी संबंधित लिंकवर क्लिक करा.'Apply Online' वर क्लिक करा.नोंदणी करा आणि आपले तपशील द्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.