BEL Recruitment 2021: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडून इंजिनिअर पदासाठी नोकरी भरती निघाली आहे. यासाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. एकूण ५०० पदांवर नोकर भरती केली जाणार आहे. त्यामुळे इंजिनिअरिंग विभागात नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. इच्छुकांना बीईएलच्या bel-india.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडून जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशनचा आजचा शेवटचा दिवस आहे. म्हणजेच १५ ऑगस्ट २०२१ रोजी अर्ज करण्यासाठीचा आजचा शेवटचा दिवस आहे. नोकरीच्या शोधात असाल आणि अजूनही तुम्ही अर्ज दाखल केला नसेल तर तातडीनं bel-india.in वर जाऊन अर्ज दाखल करता येईल.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये एकूण ५०० जागांवर भरती केली जाणार आहे. यात ट्रेनी इंजिनिअर पदासाठी ३०८ जागा आणि प्रोजेक्ट इंजिनिअर पदासाठी २०३ जागांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्रोजेक्ट इंजिनिअर पदासाठी २ वर्षांचा करार केला जाणार आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही देशाती एक प्रमुख कंपनी असून भारतीय संरक्षण मंत्रालयाअंतर्गत येणारी महत्वाची कंपनी आहे. ट्रेनी इंजिनिअर पदासाठी उमेदवारांसोबत १ वर्षाचा करार केला जाणार आहे. त्यानंतर प्रोजेक्टच्या आवश्यकतेनुसार कमीत कमी २ वर्षांचा करार केला जाणार आहे.
निवड प्रक्रियाउमेदवारांची मेरिटच्या आधारे नियुक्ती केली जाणार आहे. उमेदवारांची बीई, बी.टेकची डिग्री आणि अनुभवाच्या आधारे मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे. यात बीई, बी-टेकमध्ये मिळालेल्या गुणांचं वेटेज ७५ टक्के इतकं असणार आहे. याशिवाय अनुभवासाठी १० टक्के वेटेज दिलं जाणार आहे.
अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराकडे चार वर्ष इंजिनिअरिंगची पदवी असणं बंधनकारक आहे. याशिवाय वयोमर्यादा देखील निश्चित करण्यात आली आहे. अर्जदाराचं वय २५ ते २८ वर्षांपर्यंत असणं गरजेचं आहे. यात एससी आणि एसटी प्रवर्गासाठी कमाल मर्यादेत पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे.