शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

‘साउंड इंजिनीअरिंग’क्षेत्रात मोठ्या संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 2:28 AM

हल्ली चित्रपटांमध्ये साउंड इफेक्टवर विशेष लक्ष दिले जात आहेत. खासकरून हॉलीवूड चित्रपटांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

मुंबई : हल्ली चित्रपटांमध्ये साउंड इफेक्टवर विशेष लक्ष दिले जात आहेत. खासकरून हॉलीवूड चित्रपटांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र, आता हिंदी चित्रपटांमध्येही साउंड इफेक्ट्सचा वापर वाढला आहे. सद्य:स्थितीत साउंड इंजिनीअरिंग उदयोन्मुख करिअर म्हणून नावारूपास येत आहे. भारतातच नव्हे, तर विदेशामध्ये भारतीय साउंड इंजिनीअर्सची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.ग्राफिक्सवर आधारित चित्रपट, टीव्ही चॅनेल्सची क्रेझ, याशिवाय रेडिओचे बदलते स्वरूप लक्षात घेता, साउंड इंजिनीअरिंगसारख्या स्पेशलाइज्ड कोर्सची मागणी वाढली आहे. साउंड इंजिनीअर इलेक्ट्रॉनिक आणि मेकॅनिकल उपकरणांचा वापर करून साउंड कॅप्चरिंग, रॅकॉर्डिंग, कॉपी, एडिटिंग, मिक्सिंग आणि रीप्रोड्युसिंग करीत असतात.भविष्यातील संधीभारतातील सर्वात मोठी फिल्म इंडस्ट्री महाराष्ट्रात आहे. या इंडस्ट्रीचे सर्वात महत्त्वाचे नाते साउंड इंजिनीअरिंगशी आहे. सिनेमाशिवाय नाट्य, संगीत, कला, सभा या क्षेत्रातही साउंडशिवाय गत्यंतर नाही. म्हणूनच साउंड इंजिनीअरिंग हा वेगळ्या वाटेचा एक करिअर पर्याय होऊ शकतो व त्यात विविध भूमिकाही उपलब्ध आहेत. आवाज ऐकणे ही एक कला आहे. प्रत्येक वस्तूतून निघणारा ध्वनी म्हणजे साउंड होय. साउंडला वेगवेगळे तंत्र वापरून श्रवणीय बनविणे म्हणजे साउंड इंजिनीअरिंग. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साउंडचा अभ्यास केला जातो. साउंड आणि म्युझिक ही वेगवेगळी क्षेत्र आहेत. म्युझिकला अधिक चांगले बनविण्याचे काम साउंड इंजिनीअर करतो.>कोर्स कुठे चालतो? : सातत्याने फोफावणारी फिल्म इंडस्ट्री, नाटक, संगीत, कला या क्षेत्रात साउंड इंजिनीअरला नेहमीच मागणी राहणार आहे. या विषयातले अभ्यासक्रम डिजिटल अकॅडमी, द फिल्म स्कूल, मुंबई; सर अरविंदो सेंटर फॉर आर्टस अँड कम्युनिकेशन, पाँडिचेरी, मुंबई म्युझिक इन्स्टिट्यूट, रामोजी फिल्म सिटी, हैदराबाद इ. संस्थांमध्ये उपलब्ध आहेत. अर्थात, या संस्थांना प्रत्यक्ष भेट देऊन, त्यांची पाहणी करून नंतरच प्रवेश घेणे योग्य. याशिवाय इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातर्फेही सहा महिने, एक वर्ष, दोन वर्षे मुदतीचे साउंड इंजिनीअरिंगचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. हे अभ्यासक्रम चालविणाऱ्या साउंड इंजिनीअरिंग अकॅडमीसारख्या संलग्न संस्थादेखील उपलब्ध आहेत, तसेच या संस्थांतून प्लेसमेंटही मिळवून देण्यास मदत केली जाते. करिअरच्या वेगळ्या वाटा धुंडाळू इच्छिणाºयांनी साउंडच्या या क्षेत्राला साद देण्याचा विचार करायला हरकत नाही.>पात्रता काय हवी?कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण. सायन्स पार्श्वभूमी असल्यास उत्तम. कारण सायन्समध्ये वेव्हज, फ्रिक्वेन्सी, वेव्ह लेन्थ, बँड विड्थ यांचा अभ्यास केला जातो. या कोर्सकरिता संगीताचे ज्ञान असणे आवश्यक नाही, असल्यास ते बोनस राहील.>रोजगार संधी कोणत्या आहेत?स्टुडिओ, लाइव्ह साउंड इव्हेंट, रेडिओ स्टेशन, सिंगर्स, म्युझिक कंपोझर्स.>जबाबदाºया कोणत्या असतात?स्टुडिओ मॅनेजमेंट, व्हाइस अँड इन्स्ट्रुमेंट रेकॉर्डिंग साउंड डिझायनिंग साउंड इफेक्ट.>वेतन किती मिळते?डिप्लोमा कोर्सनंतर तीन महिने इंटर्नशिप करावी. त्यानंतर, सुरुवातीचे वेतन १५ हजारांपर्यंत मिळते. परफॉर्मन्स बघून ते २० ते २५ हजारांपर्यंत दिले जाते. प्रोजेक्ट बघून उमेदवाराचे वेतन ठरविले जाते. मोठा प्रोजेक्ट मिळाल्यास दहा लाख रुपयांपर्यंतही पॅकेज मिळू शकते.