नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दलाने (BSF) हेड कॉन्स्टेबल आणि असिस्टंट सब इन्स्पेक्टर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. पात्र उमेदवार BSF ASI and HC Recruitment 2022 साठी सीमा सुरक्षा दलाच्या अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in वर निर्धारित वेळेत ऑनलाइन अर्ज करू शकतील.
अधिकृत अधिसूचनेनुसार, या प्रक्रियेद्वारे सीमा सुरक्षा दलात असिस्टंट सब इन्स्पेक्टरसाठी (स्टेनोग्राफर) 11 पदे आणि हेड कॉन्स्टेबलच्या 312 रिक्त पदांची भरती केली जाईल. एकूण रिक्त पदांमध्ये सर्वसाधारण श्रेणीसाठी 154 पदे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 41 पदे, ओबीसीसाठी 65 पदे, एससी प्रवर्गासाठी 38 पदे आणि एसटी प्रवर्गासाठी 25 पदे यांचा समावेश आहे.
किती मिळेल वेतन?असिस्टंट सब इन्स्पेक्टर पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना लेव्हल 5 अंतर्गत 29200 रुपये ते 92300 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल. तर, हेड कॉन्स्टेबल पदांसाठी लेव्हल 4 अंतर्गत 25500 ते 81100 रुपये प्रति महिना वेतन असेल. या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड लेखी चाचणी, शारीरिक चाचणी आणि टायपिंग चाचणी इत्यादींच्या आधारे केली जाईल. सविस्तर माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना तपासू शकतात.
पात्रता काय असावी?सीमा सुरक्षा दलातील या पदांवर भरतीसाठी किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 25 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत मिळेल. याशिवाय, उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, सविस्तर जाहिरात जारी केल्यापासून 30 दिवसांच्या आत उमेदवार अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतील.