BSNL Recruitment 2022 : भारत संचार निगम लिमिटेडनं अप्रेंटिस पदांसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. रिक्त पदांवर ही भरती करण्यात येणार आहे. रजिस्ट्रेशनची प्रक्रिया २२ ऑगस्टपासून सुरू झाली असून ३० ऑगस्ट रोजी अर्ज करण्याचा अखेरचा दिवस असेल. ही भरती कर्नाटक सर्कलसाठी असणार आहे. ज्यांना या पदासाठी अर्ज करायचा आहे, त्यांना सर्व आवश्यक माहिती नोटिफिकेशनमध्ये तपासून अर्ज करता येईल.
या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून १०० जणांची भरती केली जाणार आहे. ज्या उमेदवाराला अर्ज करायचा आहे, त्यानं पदवीचं शिक्षण पूर्ण केलेलं असणं आवश्यक आहे. या शिवाय इंजिनिअरिंग केलेल्या उमेदवारांनाही यासाठी अर्ज करता येईल. २०१९, २०२० आणि २०२१ या कालावधीत उमेदवारांनी इंजिनिअरिंग उत्तीर्ण केलेलं असणं आवश्यक आहे.
कशी होईल निवड?संबंधित विषयांना लागू असलेल्या मूलभूत विहित पात्रतेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. त्यानंतर उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी हजर राहावे लागेल. इतर माहिती खाली दिलेल्या अधिसूचनेद्वारे घेता येईल.
नोटिफिकेशन पाहण्यासाठी इथे क्लिक करा