कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी Google हा सर्वात चांगला मार्ग आहे असं आपण सहज म्हणतो. एखाद्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल तर तो गुगलच्या माध्यमातून कोणतीही माहिती सहज मिळवू शकतो. पण गुगलमध्येही अनेक चुका आहेत आणि याचा खुलासा इंदूरमध्ये राहणाऱ्या अमन पांडे या तरुणानं केला आहे. अमन पांडे मूळचा झारखंडचा आहे. त्याचे शालेय शिक्षण झारखंडमधून झालं आणि त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तो एनआयटी भोपाळमध्ये आला.
अमन पांडे यानं एनआयटीमधून बीटेकचं शिक्षण पूर्ण केलं आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर, स्वतःचं स्टार्टअपचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी तो इंदूरमध्ये राहू लागला. यादरम्यान त्यानं इंदूरमध्ये 'बग्स मिरर' नावाची कंपनी सुरू केली. मात्र, सुरुवातीच्या काळात त्यानं गुगलच्या ३०० हून अधिक चुका काढल्या आणि त्या सांगितल्या. गुगलला त्यांच्या चुका कळल्यावर अमन पांडे याला बक्षीस म्हणून कोट्यवधी रुपये दिले. आता इथवरच अमन पांडे थांबला नाही.
गुगलला मोबाइल फोनमधील चुका सांगितल्यागुगल येत्या काही दिवसात आपला नवीन अँड्रॉइड फोन 'गुगल 13' लॉन्च करणार आहे. Google ने 'Google 13' मोबाईलमध्ये खूप मेहनत घेतली आहे जेणेकरून या फोनमध्ये कोणत्याही चुका होऊ नयेत आणि तो इतर मोबाईल फोनपेक्षा चांगला ठरवा. पण अमन पांडे यानं नव्या अँड्रॉइड फोन गुगल 13 मधील अनेक चुकाही गुगलच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यानं गुगलच्या अँड्रॉईड फोनमधील तब्बल ४९ चुका सांगितल्या. या अशा चुका आहेत ज्यामुळे कोणतीही व्यक्ती गुगलचा नुकताच लॉन्च झालेला मोबाईल फोन सहज हॅक करू शकते आणि संबंधित व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारे त्रास दिला जाऊ शकतो.
गुगलनं अमन पांडेला दिलं कोट्यवधींचं बक्षीसगुगलनं आपल्या नवीन लाँच केलेल्या फोनमध्ये ४९ प्रकारच्या चुकांची माहिती समोर आल्यावर पुन्हा एकदा गुगलने अमन पांडेला कोट्यवधी रुपयांचं बक्षीस दिलं आहे. त्याच बरोबर अमन पांडे हा वेगवेगळ्या वेबसाईट्सच्या चुकांची माहिती त्या वेबसाईट्सना सतत देत असतो आणि त्याच्या कंपनीत आता १५ तरुण त्याच पद्धतीनं काम करत आहेत, जे वेगवेगळ्या प्रकारच्या चुका पकडून संबंधित कंपनीला माहिती देण्याचं काम करतात.
त्याचं काम पाहता अनेक कंपन्यांनी त्याच्याशी डील केली आहे. "लहानपणापासूनच काहीतरी वेगळं काम करावं, असा विचार सतत डोक्यात असायचा आणि त्याचाच परिणाम म्हणून गुगलसारख्या मोठ्या कंपनीला त्यांच्या विविध प्रकारच्या चुकांची माहिती देऊ शकलो", असं अमन पांडे सांगतो.