नवी दिल्ली : जर तुम्ही आयटी क्षेत्रात नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. फ्रान्सची आयटी कंपनी कॅपजेमिनी (Capgemini) यावर्षी भारतात बंपर भरती (Bumper Hiring in India) करणार आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, या वर्षी भारतात जवळपास 60,000 कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. ही संख्या 2021 पेक्षा जास्त आहे.
कंपनीचे सीईओ (CEO) यश्विन यार्डी यांचे म्हणणे आहे की, डिजिटल आधारित उपायांची मागणी वाढत आहे. आमच्याजवळ जागतिक स्तरावर जवळपास 3.25 लाख कर्मचारी आहेत. त्यापैकी निम्मे भारतात आहेत. नवीन नियुक्त्यांमध्ये प्रेशर हायरिंग आणि लॅटरल टॅलेंटच्या स्वरूपात असतील. यामध्ये 5G आणि क्वांटम सारख्या उदयोन्मुख क्षेत्रांवर लक्ष दिले जाईल.
कॅपजेमिनीने गेल्या वर्षी एरिक्सन (Ericsson) सोबत भागीदारी करून भारतात 5G लॅब लाँच केली. याला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे म्हणत 5G उद्योगाला अधिक सेवा देण्यासाठी आम्ही आता काही जागतिक आणि भारतीय सर्विस प्रोवाइडर्ससोबत काम करत आहोत, असे यश्विन यार्डी यांनी सांगितले.
2021 मध्ये कॅपजेमिनीने भारतात चांगली कामगिरी केली. येत्या काही दिवसांत कंपनीचा आउटलूक अधिक चांगला असणार आहे, ज्यामुळे हायरिंग ड्राईव्हला चालना मिळाली आहे. हायरिंगला चालना देण्यासाठी आम्ही महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्येही जात आहोत, असे यश्विन यार्डी यांनी म्हटले आहे.
'भारत मोठी भूमिका बजावेल'गेल्या महिन्यात कॅपजेमिनी ग्रुपचे सीईओ ऐमान इज्जत यांनी सांगितले होते की, कंपनीच्या पुढील कामकाजाचे व्यवस्थापन करण्यात भारत मोठी भूमिका बजावेल. हे भारतातील उदयोन्मुख लीडर्सकडे देखील लक्ष देईल, जे जागतिक स्तरावर संघांचे नेतृत्व करू शकतात. Quantum, 5G आणि Metaverse सारख्या उदयोन्मुख टेक्नॉलॉजीने पुढे जाणे अपेक्षित आहे.