नवी दिल्ली : सेंट्रल बँक होम फायनान्स लिमिटेडने (CBHFL) वरिष्ठ अधिकारी आणि कनिष्ठ व्यवस्थापक आणि इतर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. उमेदवार सेंट्रल बँक भर्ती 2022 साठी ( Central Bank Recruitment 2022) अधिकृत वेबसाइट cbhfl.com वर 18 ऑगस्ट 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी 30 जुलैपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
अधिसूचनेनुसार, या मोहिमेद्वारे अधिकाऱ्यांच्या पदासांठी 22 जागा, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदासांठी 16 जागा आणि कनिष्ठ व्यवस्थापकाच्या 7 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. कनिष्ठ व्यवस्थापक पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना प्रति वर्ष 5 लाख रुपये वेतन दिले जाईल. त्याचबरोबर वरिष्ठ अधिकारी पदांसाठी 4 लाख आणि अधिकारी पदांसाठी वर्षाला 3 लाख रुपये मिळेल.
सेंट्रल बँकेतील कनिष्ठ व्यवस्थापकासह इतर पदांच्या भरतीसाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच कॅम्प्युटरचे ज्ञान असणे आवश्यक आहे. याशिवाय, किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सूट मिळेल. सविस्तर माहितीसाठी तुम्ही अधिकृत अधिसूचना तपासू शकता.
या पदांसाठी निवड ऑनलाइन चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. या ऑनलाइन परीक्षेत 200 गुणांचे 200 प्रश्न असतील आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी 120 मिनिटे दिली जातील. उमेदवार 18 ऑगस्ट 2022 पर्यंत अधिकृत वेबसाइट cbhfl.com वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट तपासू शकतात.